Lemon Price Hike Pune Pudhari
पुणे

Lemon Price Hike Pune: उन्हाची तीव्रता वाढताच पुण्यात लिंबांसह फळे महागली

आवक घटल्याने लिंबाच्या गोणीमागे 250 रुपयांची वाढ; कलिंगड-खरबूजही तेजीत

पुढारी वृत्तसेवा

पुणे : उन्हाचा चटका जाणवू लागल्याने शहरातील सरबत विक्रेते, रसवंतिगृहे तसेच घरगुती स्वरूपात लिंबांना मागणी वाढू लागली आहे. त्यातुलनेत बाजारातील आवक रोडावल्याने लिंबाच्या 15 किलोंच्या गोणीमागे 200 ते 250 रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात चार रुपयांना एक, तर दहा रुपयांना तीन, याप्रकारे विक्री होत आहे.

बाजारात कलिंगड, खरबूज आणि पपई आदी रसदार फळांनाही मोठी मागणी आहे. त्यातुलनेत आवक कमी असल्याने कलिंगड आणि पपई किलोमागे दोन रुपये, तर खरबूज पाच रुपयांनी महागल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले. उर्वरित सर्व फळांची आवक-जावक कायम असल्याने गत आठवड्यातील दर टिकून होते. फळबाजारात रविवारी (दि. 8) मोसंबीची 40 ते 45 टन, संत्रा 30 ते 40 टन, डाळिंब 20 ते 22 टन, पपई 8 ते 10 टेम्पो, लिंबाची सुमारे एक ते दीड हजार गोणी, कलिंगड 15 ते 20 टेम्पो, खरबूज 20 ते 25 टेम्पो, चिकू 2 हजार गोणी, पेरू 150 ते 200 क्रेट, स्ट्रॉबेरी 6 ते 7 टन, द्राक्षे 8 ते 10 टन, अननस 6 ट्रक आणि बोरांची 100 पोती इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 300-700, मोसंबी : (3 डझन) : 120-600, (4 डझन) : 50-300, संत्रा : (10 किलो) : 250-900, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 80-300, आरक्ता : 10-80, गणेश : 10-40, कलिंगड : 18-25, खरबूज : 12-30, पपई : 12-25, चिक्कू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 600-700, अननस (1 डझन): 100-600, बोरे (10 किलो) : चमेली 400-450, चेकनट 1000-1200, उमराण 150-200, द्राक्षे (10 किलो) : जम्बो 1000-1500, सुपर सोनाका 1000-1200, सोनाका 700-900, स्ट्रॉबेरी (2 किलो) 100-350.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT