पुणे : शहरात मंगळवारी दुपारपर्यंत तब्बल 30 हून अधिक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात फुरसुंगी, खराडी आणि हडपसर अशा तीन ठिकाणी पेटत्या फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना घडली आहे, तर उर्वरित ठिकाणी आगी कशामुळे लागल्या हे अद्याप समजू शकले नसल्याचे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले.(Latest Pune News)
गॅलरीत फटाका रॉकेट पडून फुरसुंगीतील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली, तर खराडी परिसरातील गेरा सोसायटीत कचऱ्यावर फटाका पडल्याने मोठी आग भडकली, तर हडपसर येथील रेल्वेमार्गालगत गवतांना आग लागल्याच्या घटनेबरोबर शहरात मंगळवार दुपारीपर्यंत 30 हून अधिक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. गणेश पेठेतील डुल्या मारुती मंदिराजवळ चंद्रकांत शहा आणि कंपनी येथे ऑफिस आणि ग्राइंडिंगचे साहित्य होते. त्याच गोदामाला आग लागली. या ठिकाणी दोन फायर गाड्या, एक बाऊजर, एक देवदूत अशी अग्निशमन दलाची वाहने दाखल झाली होती. दरम्यान, सोमवारी दुपारपासून ते पहाटेपर्यंत 25 आगीच्या घटना घडल्या.
कात्रज-आंबेगाव पठार येथे कचऱ्याला आग, येरवडा कारागृहासमोर कचऱ्याला आग, मार्केट यार्ड येथील बैठ्या बाजाराला आग, कात्रज भारती विद्यापीठ त्रिमूती चौकातील झाडाला आग, धानोरी मुंजाबावस्ती, नेताजी स्कूल येथे आग, धानोरी येथील स्कायराईज येथे कारवाई, कोंढवा रोड, माऊलीनगर, कोरेगापार्ग, हडपसर मुंडेवस्ती, शिंदेवस्ती येथे, शनिवारवाडा येथील अहिल्यादेवी शाळेजवळ, औंध येथील शिवाजी हौसिंग सोसायटी येथे टेकडीवर, भवानी पेठेतील गोकूळ वस्ताद तालीम, बावधन येथील डील पॅलेस हॉटेल, नाना पेठेतील क्वार्टरगेट. लोहगाव येथील लेन नंबर 18 खेसे पार्क येथे, शुक्रवार पेठेत जैन मंदिरामागे, गुजरवाडी रोड, हांडेवाडी येथील धनश्री आशियाना सोसायटी, खराडीतील गेरा पार्क सोसायटी, टिंगरेनगर गल्ली नंबर 11, बाणेर येथील पॅनकार्ड क्लब येथील डोंगरावरील गवताला आग लागली. अशा असंख्य ठिकाणी आगीच्या घटना झाल्याची नोंद अग्निशमन दलाने करून तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.
05:12 : हडपसर, गल्ली क्रमांक 15 येथे मोकळ्या जागेत आग
07.20 : वारजे, दत्त मंदिराजवळ दुकानात आग
07.45 : नऱ्हे गाव, झील कॉलेजमागे एका इमारतीत गच्चीवर आग
07.58 : काळेपडळ, गजानन महाराज मंदिराजवळ गच्चीवर आग
07.59 : बुधवार पेठ, दत्त मंदिराजवळ
गच्चीवर आग
08.04 : कसबा पेठ, साततोटी पोलिस चौकीमागे, कागदीपुरा येथे एका इमारतीत चौथ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग
08.10 : विमाननगर, संजय पार्क येथे नारळाच्या झाडाला आग
08.22 - मांजरी खुर्द येथे गवताला आग
08.25 : भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाजवळ गॅलरीमध्ये जाळीला आग
08.27 : नगर रस्त्यावर वडगाव शेरी, गणेशनगर येथे एका दुचाकी वाहनाला आग
08.29 : धानोरी, कलवडवस्ती येथे मोकळ्या मैदानात कचऱ्याला आग
08.35 : वारजे, तपोधाम कमानीजवळ एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग
08.36 : कसबा पेठ, कागदीपुरा येथील नागझरीमध्ये कचऱ्याला आग
08ह्न36 : धायरी फाटा येथील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग
08.40 : विमाननगर, जीवन सुपर मार्केटजवळ एका गोडाऊनमध्ये आग
08.46 : शुक्रवार पेठ, फडगेट पोलिस चौकीसमोर घराच्या छतावर आग
08.51 : घोरपडी पेठ, मोठा गणपती मंडळ येथे चौथ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग
08.54 : गणेश पेठ, डुल्या मारुती चौक येथे एका इमारतीत गच्चीवर आग
09.02 : बाणेर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळानजीक एका घरामध्ये आग
09.25 : बी. टी. कवडे रोड एका इमारतीत पार्किंगमध्ये आग
09.28 : बाणेर, पॅन कार्ड क्लब रोड येथील इमारतीत एका घरामध्ये आग
09.38 : मंगळवार पेठ, भीमनगर कमान येथे वाड्यामध्ये घराला आग
09.45 : विश्रांतवाडी, कळस, गंगाकुंज सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर घरामध्ये आग
09.55 : येरवडा, चित्रा चौकात एका घरात आग
09:57 : सोलापूर बाजार येथे घरात
पोटमाळ्यावर आग.