प्रातिनिधिक छायाचित्र. 
पुणे

Pune News : रील्सद्वारे कायद्याचे धडे! कायदा साक्षरतेसाठी सोशल मीडियाचा वापर

अमृता चौगुले

पुणे : पुण्यातील नवोदित वकिलांनी रील्सद्वारे कायद्याचे ज्ञान देण्यास सुरुवात केली आहे. सोप्या, सुटसुटीत भाषेत कायदा समजून सांगण्याचे काम वकिलांमार्फत करण्यात येत असून, अशा रील्सना मोठी पसंती मिळत आहे. समाजात वावरणारी प्रत्येक व्यक्ती ही कायद्यानुसार काम करते व त्यानुसार चालते. मात्र, याच सामान्य माणसाला कायद्याचे ज्ञान नसते.

युवा पिढीमध्ये कायद्याबद्दल अज्ञान आहे. समाजाला कायद्याविषयी जागृत करणे ही प्राथमिक गरज बनली आहे. सामान्य नागरिक हा न्यायालयाच्या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असल्याचे अनेकदा जाणवते. स्वतःकडे असलेले पुरावेसुद्धा खटल्यात योग्यरीत्या सादर न करता आल्यामुळे न्याय मिळविण्यात अनेक अडचणी येतात, हे न्यायालयीन प्रक्रियेत दररोज दिसून येते.

न्यायालयात हजर झाल्यानंतर अनेकदा अपुर्‍या सावधानतेमुळे खोट्या गुन्ह्यात अनेक जण अडकतात. भूलथापा आणि खोट्या आमिषांना बळी पडून फसवणुकीचे सावज बनतात. त्यानुषंगाने न्यायालयात येणार्‍या सर्वसामान्यांना या सर्व पेच-प्रसंगांना सामोरे जावे लागू नये, यासाठी नागरिकांना कायद्याचे सहज व सोप्या भाषेत आकलन होण्यासाठी शहरातील नवोदित वकिलांनी इन्स्टाग्रामवरील रील्सचा आधार घेतला आहे. रील्सद्वारे नागरिकांनी कायद्याची माहिती देऊन प्रश्नांमार्फत आलेल्या शंकांचे निरसन करण्याचे कामही सुरू असल्याचे अ‍ॅड. वाजेद खान-बिडकर यांनी सांगितले.

वकिलीच्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा उपयोग होणे काळाची गरज बनली आहे. ती गरज ओळखूनच मी तंत्रज्ञानाचा उपयोग करून सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृतीचा प्रयत्न करीत आहे. लोकशाहीची मूल्ये तळागाळात रुजण्यासाठी लोकांना कायद्याची माहिती असणे गरजेचे आहे. ती माहिती छोट्या छोट्या व्हिडीओच्या माध्यमातून देत आहे.

– अ‍ॅड. सिद्धार्थ अग्रवाल

कायद्याबाबत आवश्यक ज्ञान आणि तेही सर्वसामान्यांना समजेल
अशारीतीने रीलच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे.

– अ‍ॅड. मयूर धाटावकर

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT