बम बम बोले... लाखो भाविक भीमाशंकराच्या चरणी Pudhari
पुणे

Shravan Somvar: बम बम बोले... लाखो भाविक भीमाशंकराच्या चरणी

लाखो भाविक भीमा शंकराच्या चरणी विलीन

पुढारी वृत्तसेवा

भीमाशंकर: श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. श्रावणातला तिसऱ्या सोमवारी यात्रेसाठी लाखो भाविक भीमा शंकराच्या चरणी विलीन होण्यासाठी आलेले आहेत.

यात्रेसाठी देवस्थान व प्रशासनाच्या वतीने दर्शनबारी, मुख दर्शनबारी यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच मंदिराचीआकर्षक फुलांची सजावट, मंदिराबाहेर मंडपाची व्यवस्था केली आहे. धुक्याने माखलेले भीमाशंकर जंगल भीमाशंकरचे वैशीष्ट असलेले शेकरू येथे मोठ्या प्रमाणावर आढळतात.  (Latest Pune News)

भीमाशंकर येथे महाशिवरात्र, श्रावण महिना, चातुर्मास, त्रिपुरारी पौर्णिमा या काळात उत्सव साजरे केले जातात. श्रावणातील यात्रेची प्रशासनाने, देवस्थानने जोरदार तयारी केलेली आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. वाहनतळ ते भीमाशंकर बसस्थानकापर्यंत एसटी महामंडळाने बसची सोय केली आहे. मुखदर्शन बारीमुळे भाविकांना सुविधा उपलब्ध होतआहेत. यात्रेसाठी प्रशासन सज्ज असल्याचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.

हेमाडपंथी शैलीचे मंदिर

सह्याद्रीच्या कुशीतील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे पवित्र स्वयंभू ज्योर्तिर्लिंग हे प्राचीन काळापासुन हेमडपंथी शैलीचे मंदिर आहे.येथे शिवपार्वती हे अर्ध्या भागात वसल्याने नटेनारेश्वर असेही म्हटले जाते.येथे भीमा नदीची उत्पत्ती शंकराच्या घामापासुन झाली आहे. त्यामुळे भीमेचे उगमस्थानच येथे आहे.

पवित्र शिवलींगाचे दर्शन घेऊन पायऱ्यानींंवर आल्यावर कळमजाई मातेचे मंदिर आहे. तेथील दर्शन घेतल्यानंतरच पुर्ण दर्शन होते अशी अख्यायीका आहे.

अनादी काळापासून येथे महाशिरात्री व श्रावण महिना यात्रा उत्साहात साजरी होते. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे पवित्र शिवलींगाचे दर्शन पवित्र मानले जात. अनेक हौशी पर्यटक कर्जत खांडस मार्गे गणेश घाट, शिडी घाटा मार्गे पायी मोठ्या प्रमाणावर भीमाशंकरला येतात.

भीमाशंकर सहयाद्रि पर्वत रांगांतील एक उत्तुंग शिखरावर वसलेले घनदाट अभयारण्य. जंगलातच बारा ज्योर्तीलींगापैकी एक सहावे भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे आहे व या जंगलातूनच एक प्रमुख भीमा नदी उगम पावते.

भीमाशंकर मंदिर व जंगल परीसरात अनेक ऐतिहासीक वास्तु व ठिकाणे आहेत. यामध्ये मंदिरा बाहेर असलेली पोर्तुगीज काळातील घंटा, घंटेला लागून असलेले शनि मंदिर, मंदिरा जवळचे गोरक्षनाथ मंदिर, पायर्‍यांच्या सुरवातीला असलेले कमलजादेवी मंदिर ही प्राचीन मंदिरे आहेत.

भीमाशंकर अभयाण्यात हनुमान तळे या ठिकाणी हनुमान व अंजनी मातेचे मंदिर आहे. जंगलात गुप्तभीमाशंकर हे ठिकाण असून येथे साक्षीविनायकाचे मंदिर आहे. नागफणी, मुंंबई पाँईट, भीमाशंकरच्या मंदिरा जवळून उगम पावलेली भीमा नदी तेथेच गुप्त झाली व या गुप्तभीमाशंकर ठिकाणाहून पुन्हा पुढे वाहु लागली अशी अख्यायीका असून अनादी काळापासून येथे श्रावण महिना यात्रा उत्साहात साजरी होते. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे पवित्र शिवलींगाचे दर्शन पवित्र मानले जात

पुणे, रायगड व ठाणे जिल्हयाच्या हद्दीवर १३०.७८ चौरस किलोमीटर मध्ये हे अभयारण्य कडयांमूळे दोन भागात पसरलेले आहे. १९८५ साली भीमाशंकरचे हे जंगल अभयारण्य म्हणुन घोषीत झाले आहे. हा अतिवृष्टी पावसाळी प्रदेश , थंड हवेचे ठिकाण व नजरेच्या टप्प्यात सभोवतालचा परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो . समुद्रसपाटी पासुन सुमारे ४००० फुट उंचीवर असल्याने थंडहवा, बोचरी थंडी व पावसाळ्यात जोरदार पाऊस, दाट धुके निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर आहे.

यात पावसाळी पर्यटनासाठी अतिशय उत्तम ठिकाण. निसर्गाची मुक्त उधळण या परीसरात पहावयास मिळते. भीमाशंकर जंगलात अनेक पहाण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत. या ठिकाणी असलेल्या सर्वांत उंच अशा नागफणी टोकावर गेल्यावर कडयाच्या तळापर्यंत खेटलेली मुंबईच्या आजुबाजुची गावे, पदरचा किल्ला, तुंगी, कळवंतीचा महाल, माथेरानची पर्वत रांग, घोणेमाळ, सिध्दगड असा परिसर दिसतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT