Extortion Case Pudhari
पुणे

Kurkumbh Factory Extortion: कुरकुंभच्या कारखाना संचालकाला धमकी देत खंडणीची मागणी; एकावर गुन्हा दाखल

ठरवून दिलेल्या दराने साल्व्हंट व मोकळे ड्रम देण्याची मागणी; तक्रार केल्यास कारखाना बंद पाडण्याची धमकी

पुढारी वृत्तसेवा

कुरकुंभ: कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्याच्या संचालकाला धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी एकावर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शरद शितोळे (रा. पांढरेवाडी कुरकुंभ, ता. दौंड) असे गुन्हा दाखल असलेल्याचे नाव आहे. याबाबत दीपक मोरारजी ठक्कर (वय ५७, रा. फ्लॅट नंबर २८, एच ५ शिवशक्ती सोसायटी, मॉडेल टाउन शेजारी, मुलुंड पश्चिम मुंबई) यांनी फिर्याद दिली.

कारखान्याचे संचालक कल्पेश ठक्कर यांना मोबाईल फोनवर व्हाट्सॲप काॅल आला होता. समोरच्या व्यक्तीने शरद शितोळे बोलतो असे सांगितले. 'कारखान्यात तयार झालेला माल मला पाहिजे. प्रक्रिया केलेला सालव्हंट (माल) किती रुपयांत विक्री करता मला काही माहिती नाही.

मी सांगेल त्याच किंमतीत माल द्यावा लागेल. मोकळे ड्रम माझ्याकडून व मी सांगेल त्याच किंमतीत घ्यावे लागेल. तसे न केल्यास मी स्थानिक असल्याने कारखान्याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडे तक्रार करून कारखाना बंद करेल', असे सांगत हातपाय तोडण्याची धमकी दिली.

कारखान्याशी पत्रव्यवहार किंवा ई-मेल व कोणत्याही प्रकाराचा व्यवहार न करता धमकावून जबरदस्तीने प्रक्रिया केलेला सालव्हंट मालाची मागणी केल्याची तक्रार कल्पेश ठक्कर यांनी दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT