Kurkumbh MIDC Pollution Pudhari
पुणे

Kurkumbh MIDC Pollution: कुरकुंभ एमआयडीसीतून खडकवासला कालव्यात दूषित सांडपाणी; शेतकऱ्यांची चिंता वाढली

रात्रीच्या वेळी टँकरद्वारे काळे आणि दुर्गंधीयुक्त रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप; शेतीच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

विनोद गायकवाड

पांढरेवाडी: दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतून प्रदूषणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कुरकुंभ एमआयडीसीच्या गिरीम बाजूकडील डोंगराच्या पायथ्याशी वाहणाऱ्या खडकवासला कालव्यात औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीकडून रात्रीच्या वेळी टँकरद्वारे दुर्गंधीयुक्त, दूषित रसायनयुक्त काळे सांडपाणी थेट सोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

यामुळे कालव्याच्या पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. खडकवासला कालवा हा परिसरातील शेतीसाठी महत्त्वाचा जलस्रोत आहे. या कालव्यात दुर्गंधीयुक्त काळे सांडपाणी मिसळत असल्याचे समोर आल्याने औद्योगिक प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

औद्योगिक सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित कंपन्यांची असताना अशा प्रकारे कालव्याच्या पाण्यात दूषित पाणी सोडले जात असल्यास ही बाब गंभीर आहे. या पाण्याचा वापर शेतीसाठी होत असल्याने पिके, जमिनीची सुपीकता आणि परिसरातील पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणच्या पाण्याचे नमुने तातडीने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT