Book  Pudhari
पुणे

Granthottejak Sanstha: ‘कोशांचा कोश’ प्रकल्प अंतिम टप्प्यात; जूनमध्ये प्रकाशनाची शक्यता

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेकडून 400 हून अधिक कोशांची माहिती संकलित; अभ्यासकांसाठी महत्त्वपूर्ण स्रोत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विविध विषयांवर कोणते कोश उपलब्ध आहेत, याची कल्पना अभ्यासकांना, संशोधकांना असतेच असे नाही. अभ्यासक, संशोधकांची हीच अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र ग््रांथोत्तेजक संस्थेकडून कोशांचा कोश साकारला जात असल्याचे ऐकून आनंद होईलच, हो खरेय... ‌‘कोशांचा कोश‌’ प्रकल्पाचे काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

आत्तापर्यंत सुमारे 400 कोशांची माहिती गोळा करण्यात आली असून, पुढील वर्षी जूनपर्यंत हा कोश प्रकाशित होण्याची शक्यता आहे. या कोशातून वैद्यकीय कोशापासून ते विज्ञान कोशापर्यंतची माहिती उपलब्ध होणार आहे. यात लेखक, संपादक, प्रकाशक, आवृत्ती, मूल्य याची माहितीही असेलच. यासोबतच वेगवेगळे कोश कोणत्या ग््रांथालयात उपलब्ध आहेत आणि या विविध कोशांमध्ये असलेल्या माहितीचा सारांशही देण्यात येणार आहे. या कोशामुळे अभ्यासकांना, संशोधकांना विविध कोशांची माहिती उपलब्ध होणार असल्याने त्या त्या विषयांचा अभ्यास करणे सोयीचे होणार आहे.

मराठी कोश वाङ्मय खूप समृद्ध आहे. मराठी कोशवाङ्मयात सातत्याने नव्या कोशांची भर पडत आहे. अभ्यासकांना संदर्भ वाङ्मय म्हणून कोश अत्यंत उपयुक्त असतात. परंतु, या कोशांबद्दल कोशसूचींमध्ये माहिती उपलब्ध असली, तरी ती पुरेशी नाही. त्यात लेखक, संपादक, प्रकाशक, आवृत्ती, मूल्य याची माहिती असते. पण, सूचीवरून कोशात काय माहिती दिली आहे, ती कळत नाही. त्यामुळे अभ्यासकांची मोठी अडचण होते. अभ्यासकांची अडचण समजून 2018 साली कोशांचा कोश तयार करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. शब्दकोश आणि ज्ञानकोश, असे कोशांचे दोन प्रकार आहेत. संस्था तयार करीत असलेला कोश हा या दोन्हींपेक्षा वेगळा असून, आत्तापर्यंत 400 कोशांच्या नोंदी करून झाल्या आहेत.

आता हा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून, जूनपर्यंत हा कोश प्रकाशित होणार आहे. संस्थेचे कार्यवाह डॉ. अविनाश चाफेकर म्हणाले, विविध माहितीपर कोशांची माहिती एकाच कोशांत अभ्यासकांना, संशोधकांना मिळावी, यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला. 2018 साली या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. कोरोनामुळे हे काम रखडले होते. परंतु, आता हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. कै. अनंत वेलणकर आणि रवींद्र ठिपसे या दोघांनी माहिती मिळविण्यासाठी मोठे साहाय्य केले. मी या माहितीचे लेखन, संपादन करीत आहे.

कोशात नेमके काय असणार?

‌‘कोशांचा कोश‌’मध्ये देवीकोश, वाणिज्यकोश, विज्ञानकोश, श्री गणेश उपासना संग््राह, वैद्यकीय कोश अशा विविध विषयांवरील कोशांची माहिती असणार आहे. अगदी 1896 मध्ये तयार केलेला जुना स्थलनामकोश असो वा जुन्या काळातील लेखक-संपादकांनी निर्मिलेले कोश, असे सारे काही या ‌‘कोशांचा कोश‌’मध्ये उपलब्ध होईल. हा ‌‘कोशांचा कोश‌’ सुरुवातीला छापील स्वरूपात उपलब्ध असेल.

अभ्यासकांची अडचण लक्षात घेऊन कोशांचा कोश साकारावा ही कल्पना आली. त्यानंतर यासाठीचे काम सुरू झाले. विविध ग््रांथालयांमध्ये जाऊन आणि अभ्यासकांशी बोलून कोशांची माहिती गोळा केली आहे. आता हा कोश पूर्ण होणार असून, हा शब्दकोश नाही तर हा माहितीकोश किंवा ज्ञानकोश स्वरूपात असणार आहे. या कोशात मराठीतील कोशांची माहिती असणार आहे. आत्तापर्यंतच्या अभ्यासात असे लक्षात आले की, मराठी वाङ्मयात विश्वात 500 हून अधिक कोश उपलब्ध आहेत. ज्यांच्या नव्याने प्रकाशित होणाऱ्या माहिती कोशांबद्दलची माहिती आम्हाला कळवावी, त्या कोशांच्या माहितीचाही समावेश यात करण्यात येईल.
डॉ. अविनाश चाफेकर, कार्यवाह, महाराष्ट्र ग््रांथोत्तेजक संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT