Notice Pudhari
पुणे

Koregaon Park Flood Line Debris: कोरेगाव पार्कमध्ये पूररेषेजवळ राडारोडा; महापालिकेची नोटीस

भराव तातडीने हटवण्याचे आदेश; नियमभंग केल्यास कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव पार्क: ‌‘पूर नियंत्रणरेषेजवळ राडारोड्याचे ढीग‌’ या मथळ्याखाली शनिवारच्या (दि. 25 एप्रिल) दै. ‌‘पुढारी‌’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीची त्वरित दखल घेऊन महापालिका प्रशासना तील बांधकाम अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी केली. तसेच, संबंधितांना नोटीस पाठविण्यात आली आहे. त्या नोटिशीद्वारे पूर नियंत्रणरेषेत भराव टाकणाऱ्या बिल्डरला आणि जागामालकाला टाकलेला भराव तातडीने स्वतःहून काढून घेण्याच्या नोटिशीमध्ये उल्लेख केला आहे.

नदीपात्र परिसरात टाकल्या जाणाऱ्या राडारोड्याबद्दल जागेची पाहणी केली आहे. भाऊ काचीवस्तीतील पूर नियंत्रणरेषेच्या परिसरात राडारोडा आहे. संबंधितांना नोटीस पाठविण्यात आली आहे. राडारोडा न हटविल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे महापालिका कनिष्ठ अभियंता नितीन चांदणे यांनी दै. ‌‘पुढारी‌’ शी बोलताना सांगितले.

पुणे आरटीओ रस्ता परिसरातील एसएसपीएमएस मैदानालगत असलेल्या भाऊ काचीवस्तीजवळील रिकाम्या जागेत माती आणि राडारोडा टाकला जात होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडही केली आहे. राडारोड्याच्या ढिगांची उंची जवळ असलेल्या घरांच्या वर गेल्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एसएसपीएमएस मैदानाजवळ बिटीशकाळापासून भाऊ काचीवस्ती आहे. या ठिकाणी सध्या सुमारे चाळीस कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र, खासगी जागेचा मालक आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या संगनमताने पूर नियंत्रणरेषेच्या परिसरात केमिकलयुक्त माती आणि राडारोडा टाकून भराव टाकला जात होता.

भराव टाकल्याने पावसाळ्यात या भागात पूरस्थिती गंभीर होण्याचा धोका आहे. परिसरात वृक्षतोडही केली आहे. वृक्ष अधिकाऱ्यांकडून संबंधितांना नोटीस बजावली आहे. नदीपात्र परिसरात टाकल्या जाणाऱ्या राडारोड्याबद्दल जागेची पाहणी केली आहे. भाऊ काचीवस्तीतील पूर नियंत्रणरेषेच्या परिसरात राडारोडा आहे. संबंधितांना नोटीस पाठवून राडारोडा हटविण्यात येईल, असे चांदणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT