सुरेश मोरे
कोंढवा: महायुतीला मुस्लिम मतदार मतदान करीत नाहीत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, कोंढवा-कौसरबाग प्रभाग क्र. 19 मधील महापालिकेच्या निवडणुकीवरून हे लक्षात येते. विधानसभेला तुतारीला धो-धो मते मुस्लिम मतदारांची मिळाली. याच उद्देशाने महापालिका निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारांना ऐनवेळी तुतारीवर लढविण्यात आले. पण, सुज्ञ मतदारांनी शरद पवार व अजित पवार गटाचा डाव हेरला, त्यांची वेगळी चाल पाहून उलट त्यांनाच मुस्लिम मतदारांनी ‘बोपदेवचा घाट’ दाखवला.
मतदार किती सुज्ञ आहेत, हे कोंढवा-कौसरबाग प्रभागातील निवडणुकीत पाहायला मिळाले. चेहरे तेच, पण वेळप्रसंग पाहून राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी चिन्ह बदलण्याची किमया केली. राष्ट्रवादीने घड्याळ्यावर नाही, तर तुतारीवर निवडणूक लढविली. मात्र, मतदार किती हुशार आहेत हे निकालानंतर नेत्यांच्या नक्कीच लक्षात आले असेल. मुस्लिम मतदारांनी महायुतीला स्पष्टपणे नाकारत पुरोगामी विचाराच्या काँग््रेास पक्षाच्या नवख्या उमेदवार तस्लिम हसन शेख, आसिया मणियार, काशिफ सय्यद या उमेदवारांना मते देऊन विजयी केले, तर कामांच्या जोरावर व दांडग्या जनसंपर्कावर तुतारीचे गफुर पठाण कसेबसे निवडून आले.
तेहजीब सिद्दीकी यांनाही मोठ्या संख्येने मते मिळाली. शेवटचे मत मोजेपर्यंत श्वास रोखून ठेवण्याची वेळ काँग््रेास सोडून सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांवर आली होती. मुस्लिम मतांच्या त्सुनामीपुढे भल्याभल्या उमेदवारांचा टिकाव लागला नाही. मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, दोनवेळा राष्ट्रवादीमधून निवडून आलेल्या नंदा लोणकर, माजी आमदार महादेव बाबर यांचा मुलगा प्रसाद बाबर, माजी नगरसेविका मेघा बाबर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजप, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएम व इतर पक्षांच्या उमेदवारांनी हायटेक प्रचार केला होता.
मतदारांना आपलेसे करण्यासाठी नवनव्या युक्त्यांचा वापर केला. मात्र, कुणाच्या आमिषाला कोंढव्यातील मतदार बळी पडला नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास महायुतीचाच घटक पक्ष आहे, हे मुस्लिम बांधव कालही सांगत होते आणि आजही सांगत आहेत. मोठ्या फरकाने गफुर पठाण निवडून येतील, असा अंदाज वर्तविला जात होता. परिसरात सातत्याने केलेली कामे व सर्वसाधारण लोकांना केलेली मदत त्यांना कामाला आली म्हणूनच दोन हजार मतांनी गफुर पठाण निवडून आले. हिंदू मतेच त्यांच्या विजयाला निर्णायक ठरली आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
...अन् मी निवडून येणार म्हणणारे ठरले अपयशी
श्वास रोखून धरणारी मतमोजणी, भल्याभल्यांना घाम फुटला होता. पहिल्या फेरीपासून काँग््रेास उमेदवारांनी आघाडी घेतली होती. मी निवडून येणारच, म्हणणाऱ्या उमेदवारांना घाम फुटला होता. समोर दिसणारे दृष्य आणि कानावर पडणारे मतांचे आकडे ऐकून काँग््रेास मतांच्या त्सुनामीपुढे आपला टिकाव लागणार नाही, हे समजून अनेकांनी मतमोजणी केंद्र सोडून घरचा रस्ता धरला. अगदी शेवटच्या फेरीत राष्ट्रवादी काँग््रेासच्या गफुर पठाण यांनी काँग््रेासच्या त्सुनामीला तोडत विजय मिळवला. अन्य मते त्यांना यावेळी निर्णायक विजयाच्या दिशेने घेऊन गेली आहेत.