Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari

Pune Municipal Councillor Husband Interference: नगरसेविका निवडून, पण कारभार पतीकडे? पुणे महापालिकेत नवा वाद

खराडी-वाघोलीतील आढावा बैठकीचा व्हिडीओ व्हायरल; महिलांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह
Published on

पुणे: महापालिका निवडणुकीच्या निकालाला आठवडा उजाडण्यापूर्वीच नगरसेविकांच्या आधी त्यांच्या पतींनीच कारभार हातात घेण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या खराडी-वाघोली भागातील एका नगरसेविकेच्या पतीने स्वच्छतेसंदर्भातील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची स्वत:च शाळा घेतली. त्यामुळे ‌‘नगरसेवक बायको नामधारी अन्‌‍ पतीच झाला कारभारी‌’ असे चित्र पाहायला मिळाले.

Pune Municipal Corporation
Pune Neonatal Diabetes Genetic Discovery: ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा जागतिक वैद्यकीय शोध; नवजात मधुमेहाशी संबंधित नवे जनुकीय उत्परिवर्तन उघड

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक 87 महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यात आता पुण्याची महापौर आता महिला होणार आहे. महिलांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळावी, या उदात्त हेतूने स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा हेतू यानिमित्ताने साध्य होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्यापही पुरुषी मानसिकता कायम आहे, याचा प्रत्यय महापालिका निवडणुकीनंतर आठ दिवसांच्या आत येण्यास सुरुवात झाली.

Pune Municipal Corporation
Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी सर्व शाळांत सामूहिक कवायत बंधनकारक; सुटी देण्यास मनाई

वाघोलीत महापालिका कर्मचाऱ्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर या नगरसेविकेने स्वच्छतेचा आढावा घेतला. मात्र, संपूर्ण बैठकीत नगरसेविका गप्प होत्या. पती महोदयांनीच सर्व आढावा घेत स्वच्छतेवरून अधिकाऱ्यांची शाळा घेतली. सोशल मीडियावर या बैठकीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या महिलांना स्वतंत्र काम करण्याची संधी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news