पिरंगुट : पुढारी वृत्तसेवा: समाजाचे आपल्यावर असलेले प्रेम, आपण समाजाचे देणे लागतो, याच भावनेतून किरण दगडे नेहमीच विकासकामे तसेच विविध कार्यक्रम करीत असतात. त्यांचे काम कौतुकास्पद आहे. त्यांचा प्रत्येक कार्यक्रम स्तुत्य असतो. त्यामुळेच त्याला नागरिकांचे भरभरून प्रेम मिळते. या प्रेमापोटीच दरवर्षी ते हजारो नागरिकांना काशी यात्रा घडवतात. आता अयोध्येलाही घेऊन जायचे नियोजन केले आहे. त्यामुळे ते जनतेच्या मनातील आशेचा 'किरण' आहेत, अशी भावना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
भाजप भोर विधानसभा निवडणूकप्रमुख आणि माजी नगरसेवक किरण दत्तात्रय दगडे पाटील आणि पीयूषा किरण दगडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर अध्यस्थानी होते. उज्जैनच्या खासदार कविताताई पाटीदार, आमदार भूमराव तापकीर, जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, शहराध्यक्ष धीरज घाटे या वेळी उपस्थित होते. माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, अमोल बालवडकर, योगेश गायकवाड, अल्पनाताई वरपे, डॉ. श्रद्धाताई प्रभुणे-पाठक, भोर तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, मुळशी तालुकाध्यक्ष राजाभाऊ वाघ, वेल्हे तालुकाध्यक्ष आनंद देशमाने, डॉ. संदीप बुटाला, सचिन मोरे, बापू मानकर, बाळासाहेब टेमकर, वैभव मुरकुटे यांसह भाजपचे पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
यंदाचा ऊर्जा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, प्रसिध्द गायक श्रीधर फडके आणि आनंद माडगुळकर यांना चंद्रकांत पाटील आणि रवींद्र वंजारवाडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या गीतरामायण कार्यक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
हेही वाचा