रामदास डोंबे
खोर: दौड तालुक्यातील बोरीपार्थी गणातील खोर गाव हे राजकीयदृष्ट्या सक्रीय असून, मतदारसंख्या आणि सहभागाच्या दृष्टीने महत्वाचे गाव मानले जाते. परंतु गेल्या तब्बल ५८ वर्षांपासून या गावाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Pune News)
सन १९६७ मध्ये नामदेव कान्होजी चौधरी यांना खोर गावातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर काही वर्षांनी पंचायत समिती निवडणुकीसाठीही एकदाच उमेदवारी देण्यात आली होती; मात्र त्यानंतर आजवर म्हणजे २०२५ पर्यंत पुन्हा कधीच खोर गावाला उमेदवारीची संधी मिळालेली नाही, या दीर्घ काळात अनेक निवडणुका झाल्या, राजकीय समीकरणे बदलली, पण खोर गाय मात्र कायम 'वंचित' राहिले.
बोरीपार्थी गणात बोरीपार्थी, खोर, देऊळगाव गाडा व पड़ची ही गावे येतात, तर केडगाव गटात बोरीपार्थी, खोर, देऊळगाव गाडा, पडवी, पिंपळाचीवाडी, केडगाय, घुमळीचा मळा, पाटील निंबाळकर वस्ती, केडगाव स्टेशन, देशमुख मळा, हंडाळवाडी, खुटबाव व एकेरीवाडी या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये खोर हे मतदारसंख्येच्या दृष्टीने अग्रणी गाव असून जवळपास ४ हजार इतके मतदान आहे. यावर्षी बोरीपार्थी पंचायत समिती गणात सर्वसाध्धरण स्त्री तर केडगाव जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण आरक्षण आले आहे.
खोर गावाने अनेक वेळा विधानसभा निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका बजावली आहे. पराभवाची किंवा विजयाची सीमारेषा ठरवणा-या क्षणी खोर गावाने उमेदवाराच्या बाजूने भक्कम उभारी घेतली आहे. तरीदेखील तिकीट वाटपाबाबत या गावाकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले आहे, हीच ग्रामस्थांची मोठी नाराजी आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की, जेव्हा मांची भासते तेव्हा सर्व पक्ष खोरकडे चाच घेतात.
पण निवडणूक झाल्यावर गावाला कापम डावलले जाते. त्यामुळे आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत खोर गावाला प्रतिनिधित्वाची न्याय्य संधी मिळावी अशी ठाम मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात, खोर गावाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात नेहमी सक्रिय भूमिका निभावली. आमचे गाव एकजुटीने मतदान करते पण नेहमी तिकोट वाटपात आम्हाला मागे ठेवण्यात येते. आता मात्र ग्रामस्थांनी ठरवले आहे की, खोरच्या उमेदवाराला संधी मिळाली पाहिजे.