Khed Panchayat Samiti Chairman Pudhari
पुणे

Khed Panchayat Samiti Chairman Election: खेड पंचायत समिती सभापतीपदी विद्या मोहिते

उपसभापतीपदी मंगेश सावंत; 9 मतांनी विजय, समर्थकांकडून जल्लोष

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: खेड पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या विद्या सयाजी मोहिते आणि उपसभापती पदी मंगेश गुलाब सावंत यांची निवड झाली. सभापती विद्या मोहिते आणि उपसभापती मंगेश सावंत यांना प्रत्येकी ९ मते मिळाली.

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सभापती पदासाठी अर्ज दाखल केलेल्या अश्विनी तरस आणि उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केलेल्या निखिल थोरवे यांना प्रत्येकी ७ मते मिळाली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यावर निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी निवडीची घोषणा केली.

त्यानंतर सभापती विद्या मोहिते आणि उपसभापती मंगेश सावंत यांच्या समर्थकांनी पंचायत समिती आवारात भंडाराची उधळण करीत जल्लोष केला. आमदार बाबाजी काळे आणि जिल्हा परिषद सदस्य तनुजाताई घनवट, दीप्तीताई भोगाडे, विनयाताई मुंगसे गणेश आरगडे यावेळी उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत खेडच्या १६ पैकी ९ जागांवर विजय मिळवून आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीवर भगवा फडकला आहे. सोमवारी (दि ९) सभापती, उपसभापती पदाची निवडणूक पार पडली.

यावेळी सभागृहात शिवसेनेचे ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ आणि शिंदे सेनेचा एक सदस्य उपस्थित होते. प्रांताधिकारी अनिल दौंडे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सभेचे कामकाज पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT