पुणे

पाण्याअभावी जळाली खरिपाची पिके ; बारामतीच्या जिरायती भागातील स्थिती

अमृता चौगुले

कार्‍हाटी : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खरीप हंगामात लागवड केलेली पिके पाण्यावाचून जळून गेली आहेत. तालुक्यातील कार्‍हाटी, माळवाडी, फोंडवाडा, भिलारवाडी, जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, देऊळगाव रसाळ आदी भागात यावर्षी पाऊसच पडला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी पावसाच्या भरवशावर पेरणी केलेली पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत. भविष्यात रब्बी हंगामालादेखील पाऊस पडतो की नाही, या आशेवर शेतकरी बसला आहे. मात्र पावसाने अशीच ओढ दिली तर जीवापाड सांभाळ केलेली जनावरे विकावी लागण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असे मत शेतकरी विजय वाबळे यांनी व्यक्त केले.

तालुक्याच्या जिरायती भागात खरीप हंगामातील पिके हीच शेतकर्‍यांसाठी वर्षभराचा आधार ठरतात. ज्वारी, बाजरी, सोयाबीन यासह कांद्याचे उत्पादन या भागात घेतले जाते, शिवाय चारापिके केली जातात. यंदा या सर्वच पिकांना पाऊस नसल्याचा मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी केलेल्या पेरण्या वाया गेल्या आहेत. शेतकर्‍यांना त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड तर बसला आहेच, शिवाय आता वर्षभर धान्य विकत घेऊन खाण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT