760 बैलगाड्यांच्या सहभागाने मुक्तादेवी यात्रेत पारंपरिक शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद Pudhari
पुणे

Bailgada Sharyat: खडकी बैलगाडा शर्यत : गोविंदशेठ खिलारी व संतोष सातपुते ठरले फायनलचे मानकरी

760 बैलगाड्यांच्या सहभागाने मुक्तादेवी यात्रेत पारंपरिक शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

मंचर : मुक्तादेवी यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खडकी (ता. आंबेगाव) येथे पारंपरिक बैलगाडा शर्यत उत्साहात पार पडली. तब्बल 760 बैलगाड्यांनी त्यात सहभाग घेतला. विशेष आकर्षण एक नंबर बैलगाड्यांची फायनलमध्ये पहिल्या दिवशी उद्योजक गोविंदशेठ खिलारी, संतोष सातपुते भराडी हे मोटारसायकलचे मानकरी ठरले.

चार दिवस चाललेल्या या शर्यतीत दररोज वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बैलगाडा विजेत्यांनी बाजी मारली. पहिल्या दिवशी जगन्नाथ विठ्ठल जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक जितेंद्र सिताराम माळूजे कुरवंडी, तर तिसरा क्रमांक तन्मय तानाजी गाडे आणि गौरव संतोष लोहोटे साकोरे यांना मिळाला.

दुसऱ्या दिवशी धनंजय दादाभाऊ लांडे व रमण महादू निलख लांडेवाडी यांनी संयुक्तरीत्या पहिला क्रमांक मिळवला.दुसरा क्रमांक अक्षय गायकवाड वडगाव पाटोळे आणि तिसरा क्रमांक उज्वला मनसुख वळती यांनी पटकावला.

तिसऱ्या दिवशी पहिला क्रमांक धोंडीभाऊ बांगर - शंकर थोरात (पिंपळगाव), दुसरा क्रमांक राजेश नाना बांगर पिंपळगाव, तिसरा क्रमांक वैभव तोत्रे सालगाव यांनी पटकावला. चौथ्या दिवशी नानासाहेब महादू गुळवे- महादू मारुती भोर (खडकी) यांच्या जुगलबंदीने अव्वल क्रमांक मिळवला. दोन नंबर फळीफोडमध्ये साईराज दाभाडे देवगाव, तीन नंबर फडीफळ अभिमन्यू पोखरकर.

विशेष आकर्षण एक नंबर बैल गाड्यांची फायनलमध्ये पहिल्या दिवशी उद्योजक गोविंदशेठ खिलारी, संतोष सातपुते भराडी हे मोटारसायकलचे मानकरी ठरले. दुसऱ्या दिवशीचे मानकरी अनुपशेठ मुळे/ बिभीषण भोसले मांजरवाडी, तिसऱ्या दिवसाचे मानकरी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील निरगुडसर.चौथ्या दिवसाचे मानकरी भैरवनाथ बैलगाडा संघटना/ विश्वनाथ पवार हे वरील चारही गाडे मालकांना एक नंबर फायनालाचा मान देऊन मोटारसायकलची रक्कम देण्यात आली.

घाटाचा महाराज अरबूज कोहिनकर जुगलबंदी खेड व मानकादेवी मित्र मंडळ /नारायणशेठ मोरे (सरपंच) खडकी जुगलबंदी यांनीही लक्षवेधी कामगिरी केली.

पारंपरिक खेळसंस्कृती जपणाऱ्या या स्पर्धेला उपस्थितांचा मोठा प्रतिसाद लाभला. खडकी ग्रामस्थांनी बैलगाडा शर्यतीचे नियोजन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT