पुणे: केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल (वय ७१) यांचे शनिवारी सायंकाळी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. केतन अग्रवाल हत्याप्रकरणाचा तपास सुरू असतानाच त्यांच्या निधनामुळे अग्रवाल कुटुंबावर पुन्हा शोककळा पसरली आहे. मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
केतन अग्रवाल याच्या मृत्यूने अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर केतनला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी देवीचंद अग्रवाल यांनी सातत्याने भूमिका मांडली. गेल्याच आठवड्यात पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कँडल मार्चमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी यात जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली होती.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना असा परिवार आहे. केतन अग्रवाल हत्याप्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशा परिस्थितीत आपल्या नातवासाठी न्यायाची लढाई लढणारे देवीचंद अग्रवाल यांचे निधन झाल्याने अग्रवाल कुटुंबावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.