पुणे

दूध गुणप्रतीच्या कपात पूर्वीप्रमाणे 30 पैसेच ठेवा : सदाभाऊ खोत

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने गाईच्या दुधाला ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ गुण प्रतिच्या दुधाला प्रति लिटर ३४ रुपये दर निश्चित केला आहे. त्या प्रमाणे दरपत्रकदेखील जाहीर केलं आहे. परंतु काही खासगी दूध ब्रॅण्डधारकांनी ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफच्या खाली दुधाची गुणप्रत असेल तर त्या दुधाला पूर्वीच्या ३० पैशांऐवजी आता १ रुपया कपात केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे हा दर पूर्वीप्रमाणेच ३० पैसे ठेवावा, अशी मागणी गुरुवारी (दि.२७) रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन मुंबईत केली आहे.

राज्यातील काही खासगी दुध ब्रँड धारकांनी कमी गुणप्रतिच्या दुधासाठी शेतकऱ्यांवर जणू दरोडाच घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फॅट्स ३.५ व ८.५ एसएनएफ गुणप्रतिपेक्षा कमी लागल्यास शेतकऱ्यांना खूप कमी दराने दूध विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत येत आहे. म्हणून फॅट्स आणि एसएनएफमध्ये पूर्वीचाच 30 पैसे हा दर असावा. सर्व खासगी आणि सहकारी दूध संघाचे दूध गुणवत्ता प्रत तपासणी यंत्राचीदेखील (लॅक्टोमीटर) तात्काळ तपासणी करण्यात यावी अशीही मागणी केल्याचे खोत यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT