Gun Firing Pudhari
पुणे

Kedgaon Firing Incident: केडगावात गोळीबार; पुण्यातील गुंडाने जमिनीच्या वादातून झाडल्या गोळ्या?

पहाटेच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण; यवत पोलिसांचा तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

केडगाव: केडगाव स्टेशन परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक गृहनिर्माण संस्थेच्या शेजारी ही धक्कादायक घटना घडली असून जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे केडगाव स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीने जमिनीच्या वादातून हा गोळीबार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पहाटेच्या शांत वातावरणात अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू आल्याने परिसरातील नागरिक घाबरून बाहेर पडले. लोकवस्तीच्या मध्यभागी ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून प्राथमिक तपास सुरू केला असून संबंधित व्यक्तींची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया यवत पोलीस स्टेशनमध्ये सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, लोकवस्तीमध्ये झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT