पुणे

Pune Ganeshotsav 2023 : कात्रज मोदक, पेढ्यांची उच्चांकी विक्री; गणेशोत्सवामुळे मागणीत वाढ

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून गणेशोत्सवाच्या मागील चार दिवसांत 24 टनांइतकी कात्रज मोदक व पेढ्यांची उच्चांकी विक्री झाली आहे. मिठाईची अडीच टनांइतकी विक्री झाली आहे. तसेच कलाकंद, मलई बर्फी, अंजीर बर्फी, मँगो बर्फी व काजूकतली आदी उत्पादनेही चोखंदळ पुणेकर ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहेत. कात्रजच्या सर्व दुग्धजन्य उपपदार्थांनाही मोठी मागणी असल्याची माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी दिली.

मागील वर्षी गणेशोत्सव कालावधीत कात्रज मोदक व पेढ्यांची 18 टन विक्री झाली होती. तर इतर मिठाईंची 5 टन विक्री झाली होती. चालू वर्षी विक्रीचा नवा उच्चांकी प्रस्थापित होण्याची अपेक्षा आहे. पुढील सहा दिवसांत आणखी 12 टन पेढे व मोदक आणि तीन टन मिठाईची विक्री अपेक्षित आहे. याचाच अर्थ गणेशोत्सवामध्ये पेढे, मोदक आणि मिठाईची मिळून सुमारे 41 टनांइतकी विक्रमी विक्री होण्याची अपेक्षा आहे.

कात्रज दूध संघाने गणेशोत्सव काळात ग्राहकांची राहणारी वाढती मागणी विचारात घेऊन श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी आदी उत्पादनेदेखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. परदेशातही नातेवाइकांना कात्रज मोदक व मिठाई पाठवण्यासाठीही मागणी अधिक आहे.

– भगवान पासलकर,
अध्यक्ष, कात्रज दूध संघ, पुणे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT