Election Analysis Pudhari
पुणे

Pune Municipal Election Analysis: काशेवाडी–डायस प्लॉट प्रभाग २२ : काँग्रेसचा गड भाजपकडे, ६२ मतांनी निकाल

मतविभाजनाचा फटका; अविनाश बागवे यांचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत पराभव

पुढारी वृत्तसेवा

निनाद देशमुख

पुणे: काँग््रेासचा गड असणाऱ्या प्रभाग क्रमांक 22 काशेवाडी-डायस प्लॉटमध्ये मतविभाजनाचा फटका पक्षाला बसला. 2017 च्या निवडणुकीत भाजपने या प्रभागात एंट्री घेतली. 2026 च्या निवडणुकीत योग्य रणनीती आखत भाजपने हा प्रभाग आपल्या ताब्यात घेतला आहे. काँग््रेासचे सर्वांत शक्तिशाली उमेदवार अविनाश बागवे यांचा केवळ 62 मतांनी पराभव झाला. दोनवेळा मतमोजणी करूनही आकडे तेच राहिल्याने हा प्रभाग काँग््रेासच्या हातातून गेला, असेच म्हणावे लागेल. भाजपचे विवेक यादव यांनी त्यांचा पराभव केल्याने यादव हे ‌‘जायंट किलर‌’ ठरले आहेत. या गटातून अ, क, ड येथून भाजपचे उमेदवार निवडून आले, तर ब गटातून काँग््रेासचा उमेदवार निवडून आला आहे. काँग््रेासच्या बागवे पती-पत्नीसह भाजपचे संदीप लडकत यांचा पराभव झाला आहे.

कॉंग््रेासचे माजी मंत्री रमेश बागवे यांचा हा प्रभाग आहे. त्यांच्यानंतर या प्रभागातून अविनाश बागवे हे येथून निवडून येत आहेत. हा प्रभागात कॉंग््रेासचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या बालेकिल्ल्याला 2017 च्या निवडणुकीत भाजपने सुरुंग लावला, तर 2026च्या निवडणुकीत हा प्रभाग जवळपास भाजपमय झाला आहे. भाजपच्या मृणाल कांबळे या ‌‘अ‌’ गटातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी अविनाश बागवे यांच्या पत्नी इंदिरा बागवे यांचा 232 मतांनी पराभव केला. ‌‘ब‌’ गटातून काँग््रेासचे रफीक शेख यांनी भाजपचे संदीप लडकत यांचा 360 मतांनी पराभव केला. ‌’क‌’ गटातून अर्चना तुषार पाटील यांनी कॉंग््रेासचे दिलशाद शेख यांचा 1 हजार 518 मतांनी पराभव केला. तर, भाजपचे विवेक यादव यांनी कॉंग््रेासचे अविनाश बागवे यांचा केवळ 62 मतांनी पराभव केला. या प्रभागात प्रामुख्याने तिरंगी लढत झाली असली तरी खरा सामना हा ‌‘भाजप विरुद्ध कॉंग््रेास‌’ असा झाला.

या प्रभागातील सर्व लढती अटीतटीच्या झाल्या. या प्रभागतील सर्व जागा जिंकण्याची रणनीती भाजपने आखली होती. प्रभागरचनेचा देखील फटका कॉंग््रेासला झाला. या प्रभागात मीरा सोसायटी व डायस प्लॉट यांचा समावेश करण्यात आला. येथून भाजप उमेदवारांना चांगली मते पडली. या प्रभागात प्रामुख्याने दोन मोठ्या झोपडपट्‌‍ट्या असून, या प्रभागात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. एसआरए, कचरा, आरोग्याचा प्रश्न, वाहतूक कोंडी हे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. येथे कॉंग््रेासची एकहाती सत्ता असून देखील या प्रभागाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. त्यामुळे मुस्लिमबहुल असूनही या प्रभागात भाजप उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली.

या प्रभागात कॉंग््रेासने एकाच घरात दोघांना उमेदवारी दिल्याने नाराजी होती. कॉंग््रेास कार्यकर्त्यांनी जोर लावूनही केवळ एक जागा त्यांना निवडून आणता आली. विवेक यादव व अविनाश बागवे यांच्यात ‌‘काँटे की टक्कर‌’ झाली. मात्र, काही थोडक्या मतांनी अविनाश बागवे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी कॉंग््रेासने देखील काही तुल्यबळ उमेदवार उभे केल्याने मतांची विभागणी झाली. याचा देखील फटका कॉंग््रेासला बसला. ‌‘ड‌’ गटात राष्ट्रवादी कॉंग््रेासकडून शाहानूर शेख यांना उमेदवारी दिली होती. शहानूर यांना तब्बल 7 हजार 592 मते पडली, तर नोटाला 575 मते पडली. या मतविभाजनाचा फटका अविनाश बागवे यांना बसला. त्यामुळे त्यांचा काही मोजक्या मतांनी पराभव झाला.

काँग््रेासवर आत्मचिंतन करण्याची वेळ

काशेवाडी-डायस प्लॉट हा प्रभाग कॉंग््रेासचा एकेकाळी गड होता. कोणताही उमेदवार उभा केला तरी विजय पक्का, असे सूत्र होते. या सूत्राला 2017 आणि 2026 च्या निवडणुकीत भाजपने छेद दिला. कॉंग््रेास उमेदवार प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहचण्यास अपयशी ठरले. बागवे यांचे या प्रभागात वर्चस्व असतानाही केवळ एक उमेदवार त्यांना निवडून आणता आला. बागवे पती-पत्नी यांचा पराभव झाल्याने त्यांना पराभवाची कारणमीमांसा करून आत्मचिंतन करावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT