पुणे: कसबा पेठेतील वस्तीतील मोकळ्या जागेवर जिथे मध्यरात्री किंवा अगदी पहाटे कचरा टाकण्यासाठी नागरिक येतात अन् येथे कचरा टाकून जातात. हेच चित्र बदलण्यासाठी मुलांनी पाडू आता इथे हा उपक्रम हाती घेतला अन् स्वच्छतेचा संदेश दिला. जिथे नागरिक कचरा टाकतात त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून मुलांनी येथे क्रिकेट आनंद घेतला आणि प्रजासत्ताक दिन साजरा केला. वस्तीतील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम मुलांनी केले.
भीमनगरवस्तीतील १०-१५ वयोगटातील ते मुलांनी स्वच्छ संस्था आणि पुणे महानगरपालिकेच्या साथीने वस्तीतील सार्वजनिक मोकळ्या जागेवर कचरा पडू नये, यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्याच जागी क्रिकेट स्पर्धा निश्चय केला. त्या जागेचे खेळाच्या छोट्या मैदानात रूपांतर करण्यात आले. यासाठी संस्थेच्या समन्वयकांनी मुलांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले आणि स्पर्धांचे आयोजन देखील केले.
परिसरात स्वच्छ संस्था आणि पुणे महानगरपालिका यांचा उपक्रम सात दिवसांची कचरा संकलन सेवा राबवली जात आहे. कसबा पेठ आणि भवानी पेठ परिसरातील स्वच्छतेची गुणवत्ता सुधारावी, नागरिकांना समान कचरा संकलन सेवा मिळावी तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारे कचऱ्याचे ढीग किंवा ‘क्रॉनिक स्पॉट्स’ कमी व्हावेत, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
हे ठिकाण पूर्णपणे भरलेले असायचे. आता ही जागा स्वच्छ झाली आहे, त्यामुळे आम्ही येथे रोज आहोत, आता आमच्या परिसरात कुणीही रस्त्यावर कचरा टाकू नये, यासाठी आम्ही सगळ्यांना सांगणार आहोत, अशा विविध प्रतिक्रिया मुलांनी नोंदवल्या. कालपर्यंत कचऱ्याचा ढीग असलेली ही जागा आता मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित सार्वजनिक जागा बनली आहे.
सोमवारी सुनील यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या साथीने या जागेची स्वच्छता केली आणि स्वच्छ संस्थेच्या समन्वयकांनी घरोघरी जाऊन उघड्यावर कचरा न टाकता कचरावेचकांना कचरा कचरा जनजागृती केली. मुलांनी पुन्हा मिळवलेल्या या भिंतीवर पाडू आता इथे असा संदेश लिहिण्यात आला.