पुणे

Pune : बारा गावांसाठी करंदी उचलपाणी योजना

अमृता चौगुले

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा :  शिरूर तालुक्यातील 12 दुष्काळी गावांसाठी कळमोडी अथवा डिंभा कालव्यावरून योजना योग्य आहेच. मात्र, यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 150 कोटींची उचलपाणी योजना करंदीहून पाबळ-केंदूरसाठी शक्य असल्याचा प्रकल्प अहवाल सादर केला आहे. तो मंजूर करून घेऊ, अशी ग्वाही भाजपाच्या आंबेगाव-शिरूर विधानसभेच्या प्रभारी जयश्री पलांडे यांनी दिली. या वेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राम गावडे, अशोक टाव्हरे उपस्थित होते.

केंदूर येथे उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर पलांडे यांनी सांगितले की, 12 गावांच्या पाणीप्रश्नी सन 2001 मध्ये मुंबईत उपोषण केले होते. केंद्र सरकारकडून 126 कोटींची योजना मंजूरही झाली होती. मात्र, 10 टक्के लोकवर्गणीच्या अटीने ती झाली नाही. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न नक्कीच सुटेल. दरम्यान, साखळी उपोषणाच्या 9व्या दिवशी हिवरे कुंभार गावचे वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी समाधान डोके, मारुती शेळके, दीपक खैरे, अमोल जगताप, पंढरीनाथ तांबे, संतोष मांदळे, राहुल मांदळे, सरपंच अमोल थिटे, शहाजी सुक्रे, भरत साकोरे, सूर्यकांत थिटे, विठ्ठल ताथवडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT