Pune Illegal Gutkha Seizure Pudhari
पुणे

Pune Illegal Gutkha Seizure: काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई; १.०९ लाखांचा गुटखा साठा जप्त, एकाला अटक

हडपसर परिसरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा उघड; गुप्त माहितीवरून पोलिसांची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पुणे: प्रतिबंधित गुटखा, सुगंधी सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून त्याची विक्री व पुरवठा करणाऱ्यावर काळेपडळ पोलिसांनी कारवाई करत तब्बल १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

शेराराम कानाराम देवासी (वय २४, रा. संकल्पविहार गल्ली क्र. ७, काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस हवालदार अमोल फडतरे व महादेव शिंदे यांना काळेपडळ परिसरातील ढेरे कंपनीजवळील कंजारभाट वस्‍तीवर गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

त्‍यांतील विक्रीसाठी १५ हजार ४२० रुपयांचा गुटखा घेऊन जात असताना देवासी याला ताब्यात घेण्यात आले. त्‍याच्याकडे तपास केल्‍यानंतर त्याला हा गुटखा त्‍याचा मित्र सोगाराम परमार (३३, एकता कॉलनी, काळेपडळ) याने दिल्‍याचे समोर आहे.

सोगाराम हा काळेपडळ परिसरामध्ये गुटखा विक्रेत्‍यांना पुरवठा करत असल्‍याने निष्पन्न झाल्‍यानंतर सोगारामने लपवून ठेवलेला गुटखा जप्‍त करण्यात आला. केतेश्वर कॉलनी येथील एका खोलीतूनहा गुटखा जप्‍त करण्यात आला.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्‍हे निरीक्षक अण्णासाहेब बाबर, सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे, उपनिरीक्षक विनायक गुरव, हवालदार प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, शाहीद शेख, अमोल फडतरे, अतुल पंधरकर यांच्‍या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT