vehicle vandalism Pune
पुणे : विश्रांतवाडीतील धानोरी येथील मुंजाबा वस्ती परिसरात एका अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात चार ते पाच वाहनांच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना बुधवारी (दि.२३) सायंकाळी 7 वाजता घडली. त्याच्याकडे रागाने पाहिल्याचा कारणातून त्याने ही तोडफोड केली.
या घटनेनंतर संबंधित ठिकाणच्या नागरिकांनी त्याला चांगला चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती विश्रांतवाडी पोलिसांनी दिली.