सासवड : पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड (ता. पुरंदर) येथील उपबाजारात धान्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. बुधवारी (दि. 7) ज्वारीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 4 हजार 111 रुपयांचा दर मिळाल्याची माहिती निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली.
सासवड उपबाजारात गराडे, परिंचे, वीर, दिवे, वाल्हा, राजुरी, वाघापूर, माळशिरस यासह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागांतून ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते. बुधवारी सासवड उपबाजारात एक नंबर प्रतीच्या ज्वारीला कमाल 4 हजार 111 रुपये, तर दोन नंबर प्रतिच्या ज्वारीला किमान 2 हजार 800 हजार रुपये, तर सरासरी 3 हजार 455 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, असे निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले.
या वेळी सभापती संदीप फडतरे, उपसभापती बाळासोा शिंदे, संचालक शरद जगताप, महादेव टिळेकर, गणेश होले, देविदास कामठे, वामन भाऊ कामठे, सुशांत कांबळे, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, शरयू वाबळे, भाऊसाहेब गुलदगड, संचालिका शहजान शेख, लिपीक विकास कांबळे यासह व्यापारी आर. के. ट्रेडर्सचे रुपचंद कांडगे, आर. आर. ट्रेडर्सचे राजेंद्र जळिंद्रे, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, शैलेश वीरकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, बाजार समितीच्या निरा आवारात गुळाची आवक 600 बॉक्स म्हणजेच 150 क्विंटल असल्याची माहिती माहिती गूळबाजाराचे सहसचिव नितीन किकले, कृष्णात खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी दिली. यावेळी गूळ व्यापारी शांतिकुमार कोठडिया उपस्थित होते.