मंचर: आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील जांभोरी (हरणमाळ) येथे मधमाशीपालनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला असून, या उपक्रमामुळे जांभोरी गावाला भविष्यात ‘मधाचे गाव’ म्हणून नवी ओळख मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रकल्पांतर्गत 20 बचत गटांतील आदिवासी महिलांना प्रत्येकी 10 प्रमाणे एकूण 200 मधपेट्यांचे (बी-बॉक्स) वाटप करण्यात आले असून, त्यातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
ग््राामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविणे आणि शेतीला पूरक असा व्यवसाय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खादी ग््राामोद्योगाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. जांभोरी येथे आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या हस्ते मधपेट्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी उद्योजक रमेश येवले, भीमाशंकर साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक गणेश कोकणे, निवृत्त अप्पर आयुक्त अभिमन्यू काळे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कोकणे, सरपंच प्रदीप आमुंडकर, पंचायत समितीचे सभापती कैलासबुवा काळे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष देविदास दरेकर, अंकुश लांडे, बाबाजी चासकर, संतोष पवार, लहू पोखरकर, बाळासाहेब रोडे, आशिष घोलप, अनिल वरे, मधुकरराव मुळूक यांच्यासह ग््राामस्थ आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमाची सुरुवात 2024 मध्ये भीमाशंकर दौऱ्यावर आलेल्या न्यायाधीश क्रिस्टीन स्वामिनाथन यांच्या चर्चेतून झाली. ग््राामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी खादी ग््राामोद्योगच्या सहकार्याने मधमाशीपालन प्रकल्प राबविण्याचा पुढाकार घेतला. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 दरम्यान या प्रकल्पाला प्रत्यक्ष स्वरूप देण्यात आले. महिलांना केवळ साहित्य देऊन थांबता कामा नये, या उद्देशाने त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासन व खादी ग््राामोद्योगाच्या वतीने 3 ते 12 डिसेंबर 2025 या कालावधीत 12 दिवसांचे मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
कोल्हापूर येथील तज्ज्ञ मार्गदर्शक विद्या कांबळे व सुनील कांबळे यांनी महिलांना मधमाशीपालन, मधसंकलन तसेच व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व महिलांना प्रमाणपत्रे देण्यात आली. दरम्यान, 6 मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय खादी ग््राामोद्योग मेळाव्यात केंद्रीय मंत्री मनोज कुमार यांच्या हस्ते 1000 वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात आले होते.
मधमाशीपालन उपक्रमाचे नियोजन किसन पारधी यांच्या नेतृत्वाखाली अजय मुळूक यांनी केले. या कार्यक्रमास आंबेगाव तालुका काँग््रेास कमिटीचे अध्यक्ष अशोक आप्पा काळे, निवृत्त प्राचार्य इंद्रजित जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे जांभोरी परिसरातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.