ITI Admission Pudhari
पुणे

ITI Admission: 'दहावी'ला १०० टक्के गुण मिळवणारे २३ विद्यार्थी 'आयटीआय प्रवेशा'च्या शर्यतीत

७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या २५ हजारांवर विद्यार्थ्यांचा आयटीआय प्रवेशासाठी अर्ज

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दहावीला गुण कमी पडले का मग आयटीआयला प्रवेश घे हे वाक्य नेहमी कानावर पडते; परंतु या वाक्याला छेद देणारी घटना यंदा घडली असून, दहावीमध्ये शतप्रतिशत अर्थात १०० टक्के गुण मिळवणारे तब्बल २३ विद्यार्थी, तर ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे २५ हजारांवर विद्यार्थी आयटीआय प्रवेशाच्या शर्यतीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनांतर्गत ऑगस्ट २०२६ सत्राच्या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

त्यासाठीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत 'प्लंबर-इलेक्ट्रिशियनचा अभ्यासक्रम' अशी ओळख असलेल्या आयटीआयसाठी आता शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील अर्ज केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदा १ लाख ७० हजार ३९९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. त्यातील १०० टक्के गुण मिळवणारे (२३) ९५ ते ९९.९९ टक्के गुण मिळवणारे (४०) ८५ ते ९० टक्के गुण मिळवणारे (३,३२०) ८० ते ८५ टक्के गुण मिळवणारे (७,८९५) ७५ ते ८० टक्के गुण मिळवणारे (१३,३१६) ७० ते ७५ टक्के गुण मिळवणारे (१८,२५६) ६५ ते ७० टक्के गुण मिळवणारे (२२,१०५) ६० ते ६५ टक्के गुण मिळवणारे (२२,१०५) ६० ते ६५ टक्के गुण मिळवणारे (२३,६८९) ५५ ते ६० टक्के गुण मिळवणारे (२३,८३९) ५० ते ५५ टक्के गुण मिळवणारे (२२,००६) तर ५० टक्क्यांहून कमी गुण मिळवणाऱ्या (३५,२९९) विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये १ लाख ४२ हजार ५९२ मुलांचा तर २७ हजार ८०७ विद्यार्थिनींचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रवर्गनिहाय प्रवेशासाठी अर्ज केलेले विद्यार्थी

खुला प्रवर्ग-३५ हजार १३९,

ओबीसी प्रवर्ग-४६ हजार ६०३,

एसी प्रवर्ग-३२ हजार ४७६,

एसटी प्रवर्ग-१८ हजार ९८,

डीटीव्हिजे प्रवर्ग- ६ हजार ६१,

एनटी बी प्रवर्ग-७ हजार २३१

एनटी सी प्रवर्ग-७ हजार ४०२

एनटी डी प्रवर्ग-३ हजार ४१४

इडब्ल्यूएस प्रवर्ग-३ हजार ४३४

एसबीसी प्रवर्ग-३ हजार ९६०

एसईबीसी-६ हजार ५८१

एकूण-१ लाख ७० हजार ३९९

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT