पुणे

ऑनलाईन ‘टास्क’ पडताहेत महागात ! सायबर चोरट्यांचा नवीन फंडा

अमृता चौगुले

संतोष शिंदे : 

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याची आयडिया तुमच्या अंगलट येऊ शकते. कारण पिंपरी-चिंचवड शहरात ऑनलाईन 'टास्क' देऊन सायबर चोरट्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर येत आहे. यातील विशेष बाब म्हणजे उच्चशिक्षित असलेले बेरोजगार यामध्ये अडकल्याच्या नोंदी आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर सेल करून करण्यात आले आहे.

अशी आहे मोडस ऑपरेंडी
सायबर चोरटे टेलिग्राम, इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडियाव्दारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर पार्ट टाईम नोकरीसाठी ऑफर दिली जाते. त्यासाठी टास्क दिले जातात. टास्क पूर्ण केल्यानंतर पैसे मिळतील, असे आमिष दाखवले जाते. सुरुवातीला चोरटे टास्क देऊ बदल्यात थोडेफार पैसे देऊन विश्वास संपादन करतात. त्यानंतर प्रिपेड टास्क करावे लागतील, असे सांगून पैसे घेतले जातात. त्यानंतर पुन्हा वेगवेगळे टास्क दिले जातात. नागरिकांनी पैसे मागीतले असता एकदम पैसे मिळतील, असे आमिष दाखवले जाते. जास्त रक्कम जमा झाल्यानंतर चोरटे खाते बंद करतात.

अशा आहेत घटना 

1 टास्क पूर्ण केल्यानंतर बक्षीस देण्याच्या बहाण्याने अभियंता असलेल्या सुनीलकुमार दिनेशकुमार यादव (36, रा. मामुर्डी, देहूरोड) यांची 35 लाख 31 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार मामुर्डी, देहूरोड येथे 4 डिसेंबर 2022 ते 17 मार्च 2023 या कालवधीत घडला. याप्रकरणी त्यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कायरा संजय विक्रम आणि कस्टमर केअरवरील अनोळखी इसमांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2 हॉटेलला रेटिंग देण्याचा टास्क तरुणाला दहा लाख 95 हजारांना पडला आहे. हा प्रकार 10 ते 17 मे या कालावधीत केशवनगर, चिंचवड येथे घडला. याप्रकरणी गणेश मुकुंद अमृतकर (28, रा. केशवनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टेलिग्राम चॅनल धारक आणि अन्य अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.

सोशल मीडिया हाताळताना नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तींसोबत बँक खात्याची गोपनीय माहिती शेअर करू नये. तसेच, ऑनलाईन मिळणार्‍या आमिषांना बळी पडू नये. ऑनलाईन गैर प्रकरणाबाबत नजीकच्या पोलिसांना माहिती द्यावी.
                            – डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल

टेलिग्राम किंवा व्हॉट्सअ‍ॅपवरून कमीत कमी गुंतवणुकीवर उच्च परताव्याची ऑफर किंवा आश्वासने दिले जात असतील
पैसे कमविण्यासाठी तुम्ही आधी पैसे भरा असे सांगत असेल.
नुसते क्लिक, शेयर, लाईक करून पैसे कमवा, असे सांगितले जात होते.
टेलिग्राम समूहामध्ये सामील होण्यासाठी सांगून पैशाचे आमिष दाखवले जात असेल.
तुम्हाला अनोळखी वेबसाईटवर खाते सुरू करण्यास सांगत असल्यास सावध व्हा
पैसे काढण्यासाठी नवीन टास्क पूर्ण करण्यास सूचना दिल्या जात असतील
पैसे काढण्यासाठी तुम्ही आधी पैसे भरा, असे सांगत असतील
तुम्ही जलद कृती करा किंवा त्वरित पैसे द्या, असा आग्रह करणारे संदेश येत असतील

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT