पुणे

तळेगाव दाभाडे : अभियांत्रिकीसाठी आंतरराष्ट्रीय परिषद फायदेशीर : संजय भेगडे

अमृता चौगुले

तळेगाव दाभाडे(पुणे) : तरुण अभियांत्रिकी संशोधकांनी संवाद व माहितीप्रक्रिया प्राप्तीसाठी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या व्यासपीठाचा पुरेपूर उपयोग करावा. शैक्षणिक संशोधक, अभियंते आणि उद्योग तज्ज्ञांना त्यांची नवीनतम कार्यकौशल्ये, तांत्रिक प्रगती आणि अभिनव उत्पादनांना सादर करण्यासाठी हे व्यासपीठ संधी देईल, असे मत माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांनी व्यक्त केले.

येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (एनसीईआर) मध्ये आयोजित दोन दिवसीय इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कम्युनिकेशन अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन प्रोसेसिंगच्या पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मायलॅबचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ उपस्थित होते.

या वेळी एनसीईआरचे चेअरमन राजेश म्हस्के, सहसचिव नंदकुमार शेलार, प्राचार्य डॉ. विलास देवतरे, परिषदेच्या मुख्य संयोजक प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे, डॉ. दिग्विजय पाटील आदी उपस्थित होते. हसमुख रावळ यांनी यशाची त्रिसूत्री सांगितली. या वेळी आयसीसीआयपी 2023 पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रकल्पांची माहिती एनसीईआरचे चेअरमन राजेश म्हस्के यांनी दिली. प्रा. उमा पाटील यांनी
आभार मानले.

207 शोधनिबंध सादर

उद्योग आणि कौशल्याधारित शिक्षणात अग्रेसर असलेल्या एनसीईआर अभियांत्रिकी महाविद्यालयातील या परिषदेत भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, पोलंड, मलेशिया, नायजेरिया, अमेरिका आणि इराक या सात देशांतील संशोधकांसह देशातील बहुतांश राज्यातील विद्यार्थी आणि अभियांत्रिकी संशोधकांनी भाग घेतला आहे. एकूण 207 शोधनिबंध सादर केले जाणार असल्याची माहिती डॉ. अपर्णा पांडे यांनी दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT