बारा पोलिस निरीक्षकांची अंतर्गत बदली; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश Pudhari
पुणे

Police Transfers: बारा पोलिस निरीक्षकांची अंतर्गत बदली; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश

सोमवारी (दि. 21) रात्री पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले.

पुढारी वृत्तसेवा

12 police inspectors transferred

पुणे: शहर पोलिस दलातील 12 पोलिस निरीक्षकांची अंतर्गत बदली करण्यात आली आहे. सोमवारी (दि. 21) रात्री पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले. पोलिस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील चार पोलिस ठाण्यांत पोलिस निरीक्षक गुन्हे म्हणून पदभार सांभाळणार्‍या चार अधिकार्‍यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चार पोलिस ठाण्यांतील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांची विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तमनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक विठ्ठल पवार यांची सहकारनगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Latest Pune News)

सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक यशवंत निकम यांची स्वारगेट पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी नियु्क्ती करण्यात आली आहे. सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांची चतु:शृंगी पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी नियु्क्ती करण्यात आली आहे. कोथरूड पोलिस ठाण्यातील गुन्हे निरीक्षक विक्रमसिंग कदम यांची खडकी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे, विजयमाला पवार, राहुल गौड, युवराज नांद्रे यांची वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.

चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उल्हास कदम यांची सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हे पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील गुन्हे निरीक्षक जितेंद्र कदम यांची विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हे निरीक्षक म्हणून, तर खडकी पोलिस ठाण्यातील गुन्हे निरीक्षक दत्ताराम बागवे यांची विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई लोहमार्ग पोलिस दलातून पुणे शहर पोलिस दलात बदली झालेल्या पोलिस निरीक्षक अलंकार सरग यांची बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हे निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT