पुणे

मोशीत इंद्रायणी नदीचे पात्र दुथडी भरून

अमृता चौगुले

मोशी(पुणे); पुढारी वृत्तसेवा छ मोशी परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. मावळात आंध्र धरण परिसरात मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढली आहे.

त्यामुळे इंदोरी, निघोजे, देहू, खालुंब्रे , चिखली, मोशी, मोई, कुरुळी, चिंबळी, डुडुळगाव, आळंदी, चर्‍होली याठिकाणी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीची पाणीपातळी वाढल्याने जलपर्णीदेखील वाहून गेली आहे. मोशी नजिकच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहत असले तरी काही शेतकरी अजूनही आपली परंपरागत शेती करत आहेत. यामध्ये भुईमूग, मूग, तूर, बाजरी, कांदा, भात, उडीद यांसारखी पिके घेत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिकाला जीवदान मिळाले आहे. परिसरातील राने बहरली आहेत. शेतीसाठी पुरेसा पाऊस होत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. असाच मुसळधार पाऊस बरसावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT