पुणे : पुणे विमानतळावर सलग सहाव्या दिवशी सोमवारी (दि.08) रोजी इंडिगोची 18 विमाने रद्द झाली आहेत, त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
मात्र, ट्रॅफिक कंजेक्शन (विमान कोंडी) झालेला 'पार्कींग बे' अखेर रिकामा झाला. उर्वरित 39 इंडिगो विमाने आणि इतर सर्व एअरलाइन्सची वाहतूक निर्धारित वेळापत्रकानुसार सुरळीत सुरू होती. असे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.