पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'इंडिया आघाडी मुळातच यशस्वी होणार नाही. त्यांच्यात जागावाटपावरून तेढ आहेत. पंजाब, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला जागा दिल्या जाणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर झाले आहे. त्यामुळे इंडिया आघाडी यशस्वी होईल, असे वाटत नाही,' अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी इंडिया आघाडीवर केली. पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त पुणे दौर्यावर आले असताना तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी इंडिया आघाडीवर भाष्य केले.
राज्यातील राजकारणाबद्दल ते म्हणाले, 'भाजपाला उद्धव ठाकरे यांची आता अजिबात गरज नाही. अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे राज्य सरकारला स्थैर्य आले आहे. त्याचा उपयोग राज्याला होत आहे. मराठा आरक्षणाबद्दल तावडे म्हणाले,"ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे काम करत आहेत. येत्या काळात त्याचे चांगले परिणाम दिसतील. सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हे सरकार योग्य निर्णय घेईल. त्यातून सगळ्यांचेच भले होईल, असा विश्वास आहे.'
हेही वाचा