राजगुरूनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जालना येथील जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा म्हणुन खेड तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि १) बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू केले. खेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या समोर आणि जुन्या पुणे नासिक महामार्गालगत सुरू झालेल्या या आंदोलनाला पहिल्याच दिवशी मोठी गर्दी झाली. हुतात्मा राजगुरु स्मृती शिल्पाला अभिवादन करुन तसेच व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आंदोलन सुरू झाले.
जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, बाजार समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, राजगुरूनगर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, दिलिप होले, शंकर राक्षे, जगन्नाथ राक्षे, माजी सरपंच मारूती सातकर, ऍड अनिल राक्षे, संतोष राक्षे, मनोहर वाडेकर, विकास ठाकुर बहिरवाडीच्या सरपंच वसुधा राक्षे, अर्चना पोखरकर, दिलीप ढेरंगे व मराठा बांधव भगिनी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. सुदाम कराळे यांनी सूत्रसंचालन केले. आंदोलन स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा