Pune Jilha Parishad Pudhari
पुणे

Indapur ZP PS Election: इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीची धडधड; निमगाव-शेळगाव गट केंद्रस्थानी

उमेदवारीवरून राष्ट्रवादीत नाराजी, भाजप-राष्ट्रवादीत थेट लढतीची चिन्हे

पुढारी वृत्तसेवा

संतोष ननवरे

शेळगाव: पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून, इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांसाठी राष्ट्रवादी काँग््रेास, भारतीय जनता पार्टी, काँग््रेास, शिवसेना तसेच अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः निमगाव जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

या गटात निमगाव केतकी व शेळगाव ही दोन मोठी गावे असून, राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निष्ठावंत इच्छुकांना डावलून इतरांना संधी दिल्याची चर्चा असून त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेसाठी सोनाली तुषार जाधव, निमगाव गणासाठी रणजित मनोज तर शेळगाव गणासाठी येथील जयकुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपाने निमगाव केतकी गटातून दीपाली सचिन राऊत, निमगाव गणातून गोरख आदलिंग तर शेळगाव गणातून शुभम भारत शिंगाडे यांना उमेदवारी देत आघाडी घेतल्याचे बोलले जात आहे.

शेळगाव गावाची लोकसंख्या आठ हजारांहून अधिक असताना तेथील उमेदवारी गावाबाहेर दिल्याने धनगर, माळी व अन्य राष्ट्रवादी समर्थकांमध्ये तीव नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने स्थानिक संधी देत नाराज मतदारांवर डाव टाकल्याची चर्चा आहे.

बुधवार (दि. हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. निमगाव गटात विविध पक्ष व अपक्ष असे एकूण उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले असून शेळगाव गणात तर निमगाव केतकी गणात उमेदवार रिंगणात आहेत. माघारीचे चित्र स्पष्ट होणार असून मुख्य लढत भाजप व राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये होण्याची चिन्हे आहेत. मागील निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता उमेदवारी न मिळालेल्या नेते नारायण खराडे व त्यांच्या समर्थकांची भूमिका काय राहते, याकडेही गटातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT