Indapur tamarind production Pudhari
पुणे

Indapur tamarind production: इंदापूरला चिंचेचे मुबलक उत्पादन अपेक्षित

ही झाडे पिवळसर-गुलाबी फुलांनी अक्षरशः लगडून गेली आहेत

पुढारी वृत्तसेवा

बावडा : इंदापूर तालुक्यामध्ये सध्या पोषक हवामानामुळे चिंचेची झाडे फुलोऱ्याने बहरली आहेत. ही झाडे पिवळसर-गुलाबी फुलांनी अक्षरशः लगडून गेली आहेत. त्यामुळे यंदा चिंचेचे मुबलक प्रमाणावर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी चिंचेच्या बागा आहे. तसेच, शेतात बांधावर, घरापुढे, रस्त्यांच्या दुतर्फा चिंचेची झाडे हमखास दिसून येतात. शहाजीनगर येथील निरा-भीमा कारखाना परिसरातही अनेक चिंचेची झाडे आहेत. ही झाडे सध्या दाट फुलोऱ्याने लक्षवेधी दिसत आहेत. निसर्गाचे सुंदर रूप पाहायला मिळत आहे, असे कारखान्याचे कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी नमूद केले.

उन्हाळ्यामध्ये चिंचेच्या झाडांना आलेल्या जोमदर फुलांनी ग््राामीण परिसर आकर्षक दिसत आहे. शेतात शिवारामध्ये चिंचेच्या झाडांच्या फुलांमुळे मधमाश्या तसेच पक्ष्यांची वर्दळ वाढली असून, पर्यावरण संतुलनासाठीही त्याचा फायदा होत आहे.

येत्या काही दिवसांनंतर या फुलांपासून चिंचेची फळधारणा सुरू होणार असल्याने यंदा चिंचेचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक धनंजय कोरटकर, एस. टी. मुलाणी, दादासाहेब कोळी यांनी व्यक्त केली.

चिंचेमुळे होतेय रोजगारनिर्मिती

चिंच हे ग््राामीण भागातील महत्त्वाचे ”नगदी” फळ आहे. चिंच विक्रीतून अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. चिंचा फोडण्यापासून ते चिंचोक्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीला बाजारात मागणी व चांगला भाव मिळतो, असे निरा-भीमा कारखान्याचे संचालक महेशकुमार शिर्के (वडापुरी) यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT