लाखावर महिलांच्या उपस्थितीत आज ‘लाडकी बहीण’ सन्मान सोहळा CM Eknath Shinde File Photo
पुणे

Ladaki Bahin Yojna | लाखावर महिलांच्या उपस्थितीत आज ‘लाडकी बहीण’ सन्मान सोहळा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

तपोवन मैदानावर गुरुवारी (दि. 22) लाखावर महिलांच्या उपस्थितीत लाडकी बहीण सन्मान सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीची महायुतीच्या नेत्यांनी बुधवारी सायंकाळी पाहणी केली.

पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांनी कार्यक्रमस्थळी करण्यात आलेली बैठक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आदींचा आढावा घेतला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण,

रवींद्र माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भैया माने, भाजपचे महानगराध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे,

महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT