Pune Politics: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी विश्वास दाखवून मला निवडून दिले. या आमदारकीच्या दीड वर्षाच्या काळात मतदारसंघात जे काम केले, त्यामुळे मतदारांचा आपल्यावरील विश्वास आणखीनच दृढ झाला असून, त्यातूनच आपल्याला पुन्हा पाच वर्षांसाठी निवडून देण्याचा निर्णय येथील मतदारांनी घेतला असल्याचे प्रतिपादन काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले.
धंगेकर यांनी प्रभाग क्रमांक 17 मध्ये पदयात्रेतून मतदारांशी संवाद साधला. या वेळी नागरिकांनी धंगेकर यांनी आमदारकीच्या काळात केलेली लोकोपयोगी कामे, तसेच त्याआधीही बरीच वर्षे नगरसेवक म्हणून केलेली कामे याचे आम्ही साक्षीदार आहोत, त्यामुळे आम्ही खंबीरपणे धंगेकर यांच्याच पाठीशी पुन्हा उभे राहणार अशी ग्वाही दिली.
या वेळी धंगेकर यांनीही कसबा मतदारसंघात जो विकासाचा मोठा बॅकलॉग राहिला आहे, तो येत्या पाच वर्षांत आपण निश्चित भरून काढू असे प्रतिपादन केले. या पदयात्रेत रवींद्र माळवदकर, वीरेंद्र किराड, चंद्रकांत मिठापल्ली, रवि रच्चा, विशाल धनवडे, सुनील पडवळ, नितीन गोंधळे, हेमंत येवलेकर, भाई कात्रे, योगेश आंदे, विशाखा निंबाळकर, शिवराज माळवदकर आदी सहभागी झाले होते.