पुणेः शहराचे कमाल तापमान 26.6 अंशावर आले होते.कमाल तापमानात तब्बल 10 अंशांनी घट झाली आहे. किमान तापमान 22.8 अंश सेल्सिअस इतके होते. त्यामुळे दोन तापमानातील फरक अवघा 3.8 अंशाचे आहे. असा प्रकार मे महिन्यात प्रथमच घडला आहे.
शहराचा कमाल तापमानाचा पारा 3 मे रोजी 41 ते 42 अंशावर होता.पाऊस सुरु होताच हा पारा 35 अंशावर आला. तर चार दिवसांपूर्वी 35.6 अंशावर खाली आला होता. मात्र गेल्या 24 ते 48 तासांत झालेल्या पावसाने तपामानात मोठी घट झाली. तीन दिवसांत कमाल तापमान 35.6 वरुन 26.6 अंशावर आल्याने राज्यात सर्वात कमी ठरले.तर किमान तापमान 22.8 अंशावर असल्याने शहरात थंडी वाजत आहे. (Latest Pune News)
राज्याचे शुक्रवारचे कमाल व किमान तापमान..
शहर - कमाल - किमान
पुणे - 26.6 - 22.8
अहिल्यानगर - 27.5 - 24.5
जळगाव - 34.1 - 23
कोल्हापूर - 24.8 - 22.2
महाबळेश्वर - 19.2 - 18
नाशिक - 30.2 - 23.3
सांगली - 25.5 - 22.2
सातारा - 23.2 - 22
सोलापूर - 29.4 - 23.6
मुंबई - 32.2 - 24.7