पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात दि. 4 ते 26 जुलै या कालावधीत सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यातून विद्यार्थ्यांचा झालेला अध्ययन र्हास भरून निघत आहे. त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मदत होत असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे. सेतू अभ्यास सुरू करण्यापूर्वी राज्यात 30 जून ते 3 जुलै या कालावधीत पूर्व चाचणी आणि सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर उत्तर चाचणीचे नियोजन 27 ते 31 जुलैदरम्यान करण्यात येणार आहे.
सेतू अभ्यास या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विषयासंदर्भात आधीच्या इयत्तेतील महत्त्वपूर्ण संकल्पना समजून घेणे, कृतियुक्त सरावामुळे त्याचे दृढीकरण होणे आणि विषयातील अध्ययन संपादणूक होण्यास मदत होणार आहे. तसेच, पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीच्या माध्यमातून शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणुकीचा स्तर विचारात घेऊन त्यांना वर्गातील मुलांसाठी शैक्षणिक कृती कार्यक्रम आखता येणार आहे. राज्यात 'राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021' नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.
20 दिवसांचा अभ्यास
मराठी आणि उर्दू माध्यम
46 लाख 56,433 विद्यार्थ्यांसाठी
अभ्यासक्रम छापील स्वरूपात
दिवसनिहाय कृतिपत्रिका
सेतू परिणामकारक असल्याचे निष्कर्ष…
(सर्व विषयांच्या चाचणीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांत वाढ)
इयत्ता : वाढलेली टक्केवारी
दुसरी ते पाचवी : 8.15
पाचवी ते आठवी : 5.47
नववी ते दहावी : 3.15
हेही वाचा