पुणे

पुणे : एमआयडीसी टप्पा 2 मध्ये अवैध मुरमाचा उपसा

अमृता चौगुले

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा :  खेड तालुक्यातील एमआयडीसी टप्पा क्रमांक 2 परिसरात अनधिकृत उत्खनन करून मुरमाचा उपसा दिवसरात्र सुरू आहे. महसूल विभागाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून, या गंभीर प्रकाराकडे खेडचा महसूल विभाग काणाडोळा करीत आहे. शिंदे, वासुली, खालुंबरे, वराळे, भांबोली, सावरदरी, महाळुंगे, आंबेठाण या गावच्या परिसरात मुरूमचोर दिवसरात्र आणि कोणाला न घाबरता अनधिकृतपणे मुरमाची विक्री करून लाखो रुपये कमवीत आहेत. शासनाची रॉयल्टी न भरता आयता कुठेही एमआयडीसीचा किंवा खासगी मोकळा प्लॉट दिसला की बिनधास्त जेसीबी व पोकलेन लावून मुरूम काढतात.

वरील गावच्या परिसरात प्रत्येक गावात महसूल विभागाचे तलाठी असून, त्यांचे वरिष्ठ मंडलाधिकारी यांच्या डोळ्यांदेखत दिवसा मुरूम चोरून नेला जातोय. शनिवारी किंवा रविवारी सुटीच्या दिवशी, तर मुरूमचोरांचा दिवसरात्र धुमाकूळ सुरू असतो. कुणीतरी तहसीलदार यांना फोन केला. ते सांगतात, सर्कलला सांगतो आणि सर्कलला फोन केला तर ते म्हणतात, तलाठी यांना सांगतो, अशी लिंक आहे. जेसीबी, पोकलेन व हायवा ट्रक जप्त करून मुरूमचोरांवर ठोस कारवाई कोणतेही अधिकारी करीत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT