पुणे : देशातील नामांकित व्यवस्थापन शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात आयआयएम मुंबईचे केंद्र पुण्यात सुरू करण्यात येणार आहे. पुढील वर्षी संबंधित केंद्रात अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, ऑनलाइन अभ्यासक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. (Latest Pune News)
तसेच व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम स्थानिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात येणार असल्याचे आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी यांनी स्पष्ट केले आहे. देशातील नामांकित व्यवस्थापन शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात आयआयएम मुंबईचे केंद्र पुण्यात सुरू करण्यात येणार आहे. पुढील वर्षी संबंधित केंद्रात अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, ऑनलाइन अभ्यासक्रम देखील राबविण्यात येणार आहेत.
प्रा. तिवारी म्हणाले, संबंधित केंद्रासाठी नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एका जागेचा प्रस्ताव दिला आहे. या जागेवर किंवा भाडेतत्त्वावर जागा घेऊन संबंधित केंद्र पुढील शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रात अशा प्रकारचा ‘एमबीए इन लॉजिस्टिक’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक उद्योगधंद्यांचा विचार करून अभ्यासक्रमाची रचना केली जाणार आहे. एक्झिक्युटिव्ह एमबीए अशा प्रकारचा एक ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
एक वर्षाचा फायनान्सशी संबंधित अभ्यासक्रमदेखील सुरू करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे चार ते पाच अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्यामुळे मुंबई आयआयएमचे काही प्राध्यापक त्याठिकाणी अध्यापनाचे कार्य करतील तर पुण्यातील काही तज्ज्ञ मंडळींना देखील अध्यापनासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे, तर परदेशातील नामांकित विद्यापीठांमधील काही प्राध्यापक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविणार आहेत.
या ठिकाणी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून पुढील काळात नवे अभ्यासक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रा. तिवारी यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक गरजांना प्राधान्य... एमबीएचे विविध अभ्यासक्रम आयआयएम पुणेमध्ये राबविण्यात येणार असले, तरी स्थानिक गरजांना अभ्यासक्रमात प्राधान्य दिले जाणार आहे. पुणे शहराचा विचार करता औद्योगिक कंपन्या तसेच आयटी कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात जाळे आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांसाठी मनुष्यबळ तयार करण्यासाठी स्थानिक गरजांवर भर देण्यात येणार असल्याचे देखील प्रा. तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.