IAS Pooja Khedkar on Media
पूजा खेडकरांविरुद्ध महसूल संघटनेतून कारवाईची मागणी  File Photo
पुणे

IAS Ofiicer| पूजा खेडकरांविरुद्ध महसूल संघटनेतून कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकर यांच्यावर कारवाईची मागणी जिल्ह्यातील तलाठी, नायब तहसीलदार, तहसीलदार तसेच उपजिल्हाधिकारी संवर्गाच्या विविध राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनांनी विभागीय आयुक्तांकडे केली.

पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याविरोधात आरोप केले आहेत. त्यामुळे पुणे महसूल संघटना एकवटल्या असून, खेडकर यांनी केलेल्या आरोपांचे खंडन कारवाई करण्याची केली मागणी केले आहे.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पुणे जिल्हा समन्वय समितीच्या अध्यक्षा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त (महसूल) वर्षा उंटवाल यांची भेट घेऊन त्यांनी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

या वेळी उपजिल्हाधिकारी संजय आसवले, भाऊ गलांडे, दत्तात्रय कवितके, मीनल कळसकर, डॉ. वनश्री लाभशेटवार आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

तसेच राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, राज्य महसूल कर्मचारी संघटनांनी देखील खेडकर यांच्यावर कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले.

SCROLL FOR NEXT