मंचर: आंबेगाव तालुक्यातील डिंभे गावातील एका हॉटेलमधून खरेदी केलेल्या लाडूत मानवी बोट आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे आदिवासी भागातील खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गोहे बुद्रुक येथील रामचंद्र पोटकुले यांच्या कुटुंबीयांनी डिंभे येथील एका स्थानिक हॉटेलमधून लाडू खरेदी केले होते. घरी लाडू खाताना त्यांना एका लाडूत मानवी बोट (अंगठा) आढळून आले. या घटनेने ते प्रचंड घाबरले. (Latest Pune News)
दरम्यान, कुटुंबातील काही सदस्यांनी लाडू खाल्ल्याने त्यांना उलट्या व जुलाबाचा त्रास झाला, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. हॉटेलमध्ये मशिनद्वारे लाडू बनवताना कर्मचार्याचा अंगठा मशिनमध्ये अडकून तुटला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.