पुणे

तुमचे ओठ देखील काळे पडलेत; मग हे घरगुती उपाय नक्की करा!

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आपले ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे सुंदर हवे असे सर्वच मुलींना वाटते, परंतू अनेक लोकं ओठांच्या काळपटपणामुळे चिंतेत राहतात. लिप बाम आणि मॉइस्चराइजर ओठांना मुलायमपणा तर देतात, परंतू त्यामुळे काळपटपणा काही दूर होत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ओठांचा काळपट पणा कसा घालवायचा.

कशामुळे काळे पडतात ओठ ?

आपले ओठ काळेपडण्यामागे आपल्या काही वाईट सवयी आहेत, ज्यामुळे आपले ओठ काळे पडतात. स्वस्त लिपस्टीकचा वापर, धूम्रपान करणे, कमी पाणी पिणे, जास्त औषधांचे सेवन करणे, यामुळे आपले ओठ काळे पडू शकतात. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी लोक अनेक सौंदर्य प्रसाधने वापरतात तरीही ओठांचा काळेपणा जात नाही. जर तुम्हाला तुमच्या ओठांना गुलाबी आणि सुंदर बनवायचे असतील, तर नैसर्गिक लिप बामचा वापर फायदेशीर ठरतो.

मध आणि साखरेने ओठांना करा स्क्रब

ओठांचे काळवंडलेपण दूर करण्यासाठी त्याचं वेळोवेळी स्क्रबिंग करणं खूप गरजेचं आहे. ओठांना स्क्रब करण्यासाठी एक टी स्पून मध, एक टी स्पून पिठीसाखर आणि १ टी स्पून तूप हे साहित्य एकत्र करून कालवा. त्याने ओठांना मसाज करा. यामुळेही ओठांवरची डेड स्किन निघून जाईल आणि ओठांचं काळवंडलेपण दूर होईल.

घरगुती लिप बाम कसा बनवायचा ?

एक चमच दूध घेऊन त्यात लाल गुलाबाच्या काही पाकळ्या टाका. ते दूध गुलाबी होई पर्यंत ढवळा. त्यानंतर दूधातील पाकळ्या बाहेर काढून ते दूध फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यानंतर दूधात एक चमच बदाम पावडर मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठांवर लावा. १० ते १५ मिनिटानंतर कापसाने पुसा. याने ओठ गुलाबी होतील.

गुलाबाची पाने आणि ग्लिसरीन

गुलाबाची पाने बारीक वाटून त्यात जरा ग्लिसरीन मिसळून घ्या. आता हा लेप रात्री झोपताना ओठांवर लावा. सकाळी उठल्यावर ते धुऊन टाका. हे नियमित वापरल्याने ओठांचा रंग गुलाबी आणि चमकदार होतो

साखर आणि लोणी

साखर ओठांवरील मृत त्वचेपासून सुटकारा देण्यात तर लोणी रंग वाढवण्यात मदत करतं. दोन चमचे लोण्यासोबत तीन चमचे साखर मिसळून आपल्या ओठांवर लावा.

https://youtu.be/3fSaliwKoio

SCROLL FOR NEXT