Holidays announced for all schools in Pune
पुण्यातील सर्व शाळांना सुट्या जाहीर Pudhari File Photo
पुणे

Pune Heavy Rain : पुणे आणि पिंपरीतील शाळांना सुट्टी जाहीर

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा : मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा, विमान सेवा आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. दरम्यान सखल भागात पाणी साचले आहे. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी (दि.26) शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी पुण्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी केला. यानंतर जिल्हाप्रशासनाने शहरातील शाळांनी पालकांना कळवावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन केले आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात शाळा आणि शिक्षकांनी पालकांच्या प्रतिनिधींना कळवावे, असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माध्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा शुक्रवारी (दि.26) बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी. सुट्टीच्या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे अशा ही सूचना प्रशासनाने केलेल्या आहेत.

SCROLL FOR NEXT