पुणे: हिंजवडी आयटी पार्क आणि औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणार्या कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता हिंजवडी आयटी पार्क ते छत्रपती संभाजीनगर अशी थेट बससेवा सुरू केली आहे. ही सेवा खास करून वीकेंडला गावी जाणार्या कर्मचार्यांची सोय लक्षात घेऊन सुरू करण्यात आली आहे.
एसटीच्या शिवाजीनगर आगाराकडून या सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. या नवीन सेवेमुळे छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरातून पुण्यात कामासाठी येणार्या हजारो कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता त्यांना आठवड्याच्या शेवटी थेट आपल्या गावी जाता येणार आहे आणि सोमवारी वेळेत कामावर परत येणे शक्य होणार आहे. (Latest Pune News)
बससेवेचे वेळापत्रक :- Know the bus schedule and ticket fare
- हिंजवडी आयटी पार्क फेज-3 ते छत्रपती संभाजीनगर :- दर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता बस सुटेल. यामुळे कामावरून सुट्टी होताच कर्मचार्यांना तत्काळ आपल्या गावी रवाना होता येईल.
- छत्रपती संभाजीनगर ते हिंजवडी आयटी पार्क फेज-3 :- दर सोमवारी पहाटे 4:30 वाजता बस सुटेल. यामुळे कर्मचारी सोमवारी सकाळी वेळेत हिंजवडी येथे कामावर हजर राहू शकतील.
- तिकीट दर :- फुल तिकीट - 968 रू./ हाफ तिकीट :-511 रूपये.
एसटीच्या या सेवेमुळे नक्कीच हिंजवडी भागात आयटी क्षेत्रात काम करणार्यांना दिलासा मिळणार आहे. हिंजवडी भागातील आयटी आणि औद्योगिक क्षेत्रात काम करणारे असंख्य कर्मचारी छत्रपती संभाजीनगर भागातील आहेत. त्यांना दर आठवड्याच्या शेवटी गावी जायला आणि पुन्हा आठवड्याच्या सुरुवातीला कामावर यायला सोयीस्कर झाले आहे.- सोनाली देशमुख, आयटी अभियंता
पुणे विभागाकडून ही नवीन बससेवा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. हिंजवडीतील आयटी आणि औद्योगिक कर्मचार्यांची गरज लक्षात घेऊन आम्ही हे पाऊल उचलले आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी, पुणे विभाग