पुणे

हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाईचा जामीन फेटाळला; शेतकर्‍याच्या खुनाचा प्रयत्न

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जमीन नावावर करून न दिल्याने एका शेतकर्‍याला बेदम मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणात अटकेत असलेला हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याचा जामीन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी फेटाळला. मुळशीतील दारवली गावात 1 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. याबाबत प्रदीप शिवाजी बला (दारवली, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी देसाई याच्या जामिनाला विरोध केला. देसाई याच्यावर विविध पोलिस स्टेशनमध्ये तब्बल 17 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये जातीय तेढ निर्माण करणे, खून, हत्यार कायद्यांचे उल्लंघन अशा गुन्हांचा समावेश आहे. तलवारी, कोयतेसारखी हत्यारे मिळून आली आहेत.

गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे. गुन्ह्यात वापरलेल्या पिस्तुलाचा तपास करायचा आहे. घटना घडल्यानंतर चर्चा करताना देसाई सीसीटीव्हीमध्ये दिसून आला आहे. याचा विचार करून जामीन फेटाळण्याची मागणी सरकारी पक्ष आणि फिर्यादीच्या वकिलांनी केली. बलकवडे यांना एका आरोपीने पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. अमेय बलकवडे, अ‍ॅड. सतीश कांबळे, अ‍ॅड. सुरज शिंदे आणि अ‍ॅड. ऋषिकेश कडू यांनी बाजू मांडली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT