रासने, भोकरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज Pudhari
पुणे

Maharashtra Assembly Polls: रासने, भोकरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

Elections 2024: शेवटच्या दिवशी उमेदवारांची दमछाक

पुढारी वृत्तसेवा

Pune Politics: कसबा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी भाजप-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार गणेश भोकरे यांनी मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.

अर्ज भरण्याची मुदत संपली असून, काही तांत्रिक त्रुटींसाठी आज बुधवारी (दि. 30) संधी देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीतील खरी चुरस यापुढे सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 40 व्यक्तींनी 71 अर्ज घेतले आहेत. यातून नेमके किती उमेदवारांनी अर्ज भरले आणि निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार आले आहेत, याची अंतिम आकडेवारी आज जाहीर केली जाणार आहे.

हेमंत रासने यांनी ग्रामदेवता कसबा गणपतीचे दर्शन घेत महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. पुणे मेट्रोतून मंडई स्टेशन ते स्वारगेट, असा प्रवास करत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, शिवसेनेचे अजय भोसले, सचिव किरण साळी, लहुजी शक्तिसेनेचे विष्णूभाऊ कसबे, भाजप कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, स्वरदा बापट, कुणाल टिळक यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि महापालिकेचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांची नाराजी दूर करण्यात भाजप नेत्यांना यश आले असून, हे दोघेही हेमंत रासने यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार गणेश भोकरे यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन शेकडो कार्यकर्त्यांसमवेत मतदारसंघात मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केले. ‘राजसाहेबांचा शिलेदार, कसब्यात विजयी होणार’ असा विजयी संकल्प कार्यकर्त्यांनी केला. गणेश कला क्रीडा मंच येथे अर्ज दाखल करताना शर्मिला ठाकरे यांच्यासह मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता, भोकरे यांच्या पत्नी अमृता भोकरे, शहर संघटक नीलेश हांडे आदी उपस्थित होते.

गेल्या दहा वर्षांतील मोदी सरकारचे तसेच राज्यातील महायुती सरकारच्या कामावर नागरिकांचा विश्वास. स्वर्गीय गिरीश बापट, स्वर्गीय मुक्ता टिळक या दोघांच्या कष्टातून कसब्यामध्ये अनेक विकासकामे झाली. आज महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जमलेले हजारो नागरिक हे पुन्हा एकदा या ठिकाणी महायुतीचा आमदार विजयी होणार हे दर्शवत आहे.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्र
राज्यामध्ये महायुतीचे लोककल्याणकारी सरकार यावे, ही जनतेची इच्छा आहे. कसबा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जमलेली कसब्यातील जनता हेमंत रासने यांच्या पाठीशी उभी असल्याचे दिसत आहे.
- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT