पुणे: पुणे शहरात 17 ते 27 मे असा दहा दिवस जोरदार अवकाळी पाऊस बरसला २६ मे रोजी शहरात मान्सून दाखल झाला मात्र 27 पर्यंतच तो जोरदार बरसला. त्यानंतर मात्र चार दिवस शहरात पाऊस नव्हता. त्यामुळे प्रचंड उकाडा वाढला होता.आज रविवारी एक जून रोजी सकाळी नऊ वाजता पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि सुस्तावलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला.
राज्यात अन शहरात गेल्या 48 ते 72 तासापासून मान्सून महाराष्ट्रातच थबकला आहे.तो मुंबई, पुणे, अहिल्यानगर या भागात असतो सुप्त अवस्थेत दडून बसला होता. त्यामुळे गेले तीन दिवस कमाल तापमान 22 अंशावरून 32 ते 38 वर गेले. (Latest Pune News)
त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. पुन्हा एकदा मे महिना सुरू आहे अशी आठवण या उकाड्याने करून दिली. मात्र एक जूनचा दिवस उगवला तो ढगाळ वातावरणाने, प्रचंड उघडा होत असतानाच सकाळी नऊच्या सुमानास शहरात जोरदार सरी बरसल्या सव्वानऊ नंतर पावसाने अधिक वेग घेतला आणि संपूर्ण शहराला पुन्हा एकदा चिंब केले.
शहरात अवकाळीचा अनोखा विक्रम...
हवामान विभागाच्या सरकारी दप्तरात मान्सून हंगामाचा पाऊस एक जून पासून मोजला जातो तसा तो आज 1 जून पासून 30 सप्टेंबर पर्यन्त मान्सूनचा पाऊस म्हणून नोंदवला जाईल त्याची आकडेवारी रोज दिली जाईल.
शहरात मे महिन्यात विक्रमी पाऊस...
यंदाच्या मे महिन्यात शहरात गत 64 वर्षातला विक्रमी पाऊस झाला. शिवाजीनगर भागात 260 मिलीमीटर पाषाण 270 तर लोहगाव भागात सर्वाधिक 325 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे,.हा पाऊस मान्सून हंगामात गृहीत धरला गेला नसता तरी हा बोनस पाऊस शहराच्या पर्जन्यमानात चांगलीच भर घालणार आहे. शहरात सरासरी 750 मिलीमीटर पाऊस जून ते सप्टेंबर या कालावधीत पडतो. मात्र मे मध्येच अडीचशे मिलिमीटर अवकाळी पावसाची भर पडल्याने यंदाच्या मान्सून हंगामातील पाऊस सप्टेंबर अखेर हजार मी मी पार जाईल असा अंदाज शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत.